अक्षय बडवे, साम टीव्ही
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरवर आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. फलटणचा PSI गोपाल बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख या महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहिले आहेत. या घटनेमुळे पोलिस दलावर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
अशातचा आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत या महिला डॉक्टरने पोलीस उपाधीक्षकांना लिहिलेले पत्र “साम टीव्ही”च्या हाती लागले आहे. या पत्रात डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, “पेशंट फिट आहे” असा अहवाल द्यावा, यासाठी पोलिसांकडून त्यांच्यावर दबाव होता.
पत्रानुसार, आरोपीला रुग्णालयात आणल्यावर पोलिसांकडून आरोग्य अहवाल मिळावा, यासाठी दबाव निर्माण केला जात होता. डॉक्टर यांनी ही तक्रार प्रथम पोलीस निरीक्षक महाडिक यांच्याकडे केली होती, मात्र त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याचे डॉक्टरांनी पत्रात नमूद केले आहे. पत्रात तीन पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे देखील नमूद आहेत. डॉक्टर मुंडे यांनी हे पत्र १९ जून रोजी लिहिले होते.
मागील वर्षभरापासून तिच्यावर राजकीय तसेच पोलिसांकडून दबाव टाकला जात होता. चुकीचे आणि खोटे पोर्स्टमाटम रिपोर्ट बनवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. हे नवीन पत्र बाहेर आल्याने पोलिस दबाव टाकत असल्याचे दिसून येत आहे. महिला डॉक्टरने या पत्रामध्ये पोलिस उपनिरीक्षक पाटील, जायपत्रे, तसेच गोपाल बदने या तिघांचा उल्लेख करण्यात आयला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.