Pune Politics Heat Up: धंगेकर विरुद्ध मोहोळ! पुण्यात महायुतीत राजकीय संघर्ष पेटला

Political Clash Erupts: पुण्यातल्या मॉडर्न कॉलनीतल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा वाद चांगलाच पेटलाय.. याच प्रकरणी धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांविरोधात आरोपांचं मोहोळ उठवून दिलंय... मात्र धंगेकर आणि मोहोळ यांच्यात कसा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय?
Ravindra Dhangekar and Union Minister Murlidhar Mohol lock horns over ₹3,000 crore Jain Boarding land deal in Pune.
Ravindra Dhangekar and Union Minister Murlidhar Mohol lock horns over ₹3,000 crore Jain Boarding land deal in Pune.Saam Tv
Published On

पुण्यात जैन बोर्डिंगच्या जागेच्या प्रकरणावरुन महायुतीत वादाचा भडका उडालाय... त्यातच शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आरोपांचं मोहोळ उठवलंय... तर मुरलीधर मोहोळांचा ब जीबीबी प्रकल्पाची जाहिरात करणारा व्हिडीओ पोस्ट करुन धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर निशाणा साधलाय... एवढंच नव्हे तर भ्रष्टाचार करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात संघर्ष सुरु असल्याचं सांगत धंगेकरांनी मोहोळांवर निशाणा साधलाय..

दुसरीकडे एक व्यक्ती पुण्याची राजकीय संस्कृती संपवत असल्याचा पलटवार मुरलीधर मोहोळांनी केलाय.. एवढंच नव्हे तर मोहोळांनीही धंगेकरांनी कपड्याची जाहिरात केल्याचा व्हिडीओचा संदर्भ देत हल्लाबोल केलाय..एका बाजूला धंगेकर विरुद्ध मोहोळ वाद पेटला असताना या वादात संजय राऊतांनीही उडी घेतलीय.. धंगेकर हे फक्त मोहरा असून सुत्रं हलवणारा महायुतीतील नेताच असल्याचं वक्तव्य केलंय.. तर जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपांच्या फैरीने घायाळ झालेल्या मुरलीधर मोहोळांनी मात्र राऊतांचा दावा झिडकारुन लावलाय..

खरंतर पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची 3 हजार कोटींची जमीन गोखले बिल्डरला 300 कोटींना विकल्याचं समोर आलं.. त्यानंतर धंगेकरांनी मोहोळांविरोधात मोहीमच उघडलीय.. मात्र धंगेकर विरुद्ध मोहोळ वाद हा आताचा नाही तर जुनाच आहे... पुणे महापालिकेत धंगेकर काँग्रेसचे नगरसेवक तर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात संघर्ष होता.... पुढे धंगेकर कसबा पेठेच्या पोटनिवडणुकीत मैदानात उतरले.. त्यावेळी मोहोळांनी धंगेकरांना पाडण्यासाठी मोठी ताकद लावली होती.. तर पुढे लोकसभा निवडणुकीतही मुरलीधर मोहोळांनी धंगेकरांचा पराभव केला.. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीतही मोहोळांच्या नेतृत्वात हेमंत रासनेंनी धंगेकरांना पराभूत केलं

त्यामुळे आता महापालिका निवडणूक तोंडावर आलीय... त्याआधीच धंगेकरांनी आरोपांची लड पेटवून दिलीय.. दरम्यान पुण्यात स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपला डॅमेज करुन धंगेकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेणार की पुन्हा नवी वाट चोखाळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com