...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

Doctor Allegedly Forced Over Fake Post-Mortem Report: फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच महिला डॉक्टरच्या आतेभाऊने धक्कादायक खुलासे केले आहेत.
Doctor Allegedly Forced Over Fake Post-Mortem Report
Doctor Allegedly Forced Over Fake Post-Mortem ReportSaam
Published On
Summary
  • महिला डॉक्टरने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

  • मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली.

  • कुटुबियांनी राजकीय नेते आणि पोलिसांकडून दबाव आल्याचा गंभीर आरोप केला.

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं. हॉटेलच्या एका खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने हातावर मृत्यूला कवटाळण्यामागचं कारण लिहिलं. नंतर गळफास घेतला. हातावर महिलेनं २ पोलिसांची नावे लिहिली होती. त्या पोलिसांवर महिला डॉक्टरने गंभीर आरोप केले. या प्रकरणी कुटुंबियांनी राजकीय पक्षातील नेते आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.

वर्षभरापासून महिला डॉक्टरवर राजकीय आणि पोलीस दबाव असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. खोटे शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता. यामुळे त्यांनी आयुष्य संपवलं असल्याचं महिला डॉक्टरच्या आतेभाऊने सांगितलं. साम टिव्हीच्या प्रतिनिधींना माहिती देताना त्यांनी सांगितलं.

Doctor Allegedly Forced Over Fake Post-Mortem Report
धक्कादायक! साताऱ्यातील महिला डॉक्टरनं आयुष्याचा दोर कापला; हॉटेलमधील खोलीत आढळला मृतदेह

'पोलिसांच्या दबावाला माझी बहीण कंटाळली होती. तिच्यावर राजकीय पक्षातील नेत्याचा (खासदार आणि त्यांचे पीए) दबाव होता. पोलिसांकडूनही दबाव वाढत होता. या घटनेवर आवाज उठवण्यासाठी चार महिन्यांपूर्वी महिला डॉक्टरने डीवायएसपींकडे धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली', अशी माहिती आतेभाऊने दिली.

'तक्रार दाखल केल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या तक्रारीत महिला डॉक्टरने खासदार आणि २ पीएचा उल्लेख केला होता. .यासह काही पोलिसांची नावे घेतली. वेळेत योग्य कारवाई न झाल्यामुळे बहिणीनं टोकाचं पाऊल उचललं', अशी माहिती महिला डॉक्टरच्या आतेभाऊ यांनी दिली.

Doctor Allegedly Forced Over Fake Post-Mortem Report
'विरोधी पक्षातील नेते अन् पत्रकारांच्या फोनवर नजर''; ठाकरे गटाच्या खासदाराकडून बावनकुळेंच्या अटकेची मागणी

महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया

फलटणच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत. आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महिला डॉक्टरच्या नातेवाईकांना आणखी कुणावर संशय असला, तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. फरार आरोपीच्या शोधासाठी चार पोलीस पथक रवाना करण्यात आली आहे'; अशी माहिती सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com