Maharashtra Live News Update: पुण्यातील शनिवारवाड्यावर किन्नर समाजाने केलं आंदोलन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र पाऊस, हवामान अपडेट्स, दिवाळी, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Pune: पुण्यातील  शनिवारवाड्यावर किन्नर समाजाने केलं आंदोलन

पुणे -

शनिवारवाड्यावर आता किन्नर समाजाने केलं आंदोलन

शनिवार वाड्याच्या गेटवर किन्नर समाजाने गोमूत्र आणि गंगाजल टाकून केला निषेध

मुस्लिम महिलांच्या नमाजनंतर शनिवार वाड्याचं शुद्धीकरण करण्यासाठी आता किन्नर समाजाने गोमूत्र आणि गंगाजल टाकून केला निषेध

मुस्लिम महिला वाड्याच्या आत नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवार वाड्यावर किन्नर समाजाने केलं आंदोलन

Sangli: राजे विजयसिंह डफळे हे डफळे घराण्याचे वंशज

सांगली -

राजे विजयसिंह डफळे हे डफळे घराण्याचे वंशज

राजे विजयसिंह डफळे हे जतचे राजे होते.. तसेच कारखान्याचे ही संस्थापक होते..

कर्नाटक आणि जत भागामध्ये त्यांचं घराण्याला मानलं जातं होते.

2010 मध्ये शेतकऱ्यांना आणि दुष्काळी शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी कारखाना सुरू केला होता.

Pune: आजपासून पुढील २ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुणे -

आजपासून पुढील २ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई, पुण्यासह कोकणातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच मराठवाड्यातील काही भागात पुढील २ दिवस पावसाची शक्यता

मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर यासारख्या जिल्ह्यांना येलो अलर्ट

नागपूर, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा २ दिवस राहणार पावसाचे

हवामान शास्त्रज्ञांकडून अंदाज व्यक्त

Pune: रवींद्र धंगेकर यांची ट्विट मालिका सुरूच, मोहोळ यांनी वापरलेल्या वाहनाबद्दल खुलासा

पुणे -

रवींद्र धंगेकर यांची ट्विट मालिका सुरूच

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी वापरलेल्या गाडीबद्दल रवींद्र धंगेकर यांनी केला खुलासा

महापौर असताना मोहोळ यांची गाडी एका बिल्डरच्या नावाने असल्याचं केलं ट्विट

गाडीचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत धंगेकर यांनी केली मोहोळ यांच्यावर टीका

Nashik: पुढील ३ दिवस नाशिकला पावसाचा यलो अलर्ट

पुढील ३ दिवस नाशिकला पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने पुन्हा एकदा नाशिक जिल्हा आणि घाट परिसराला यलो अलर्ट जाहीर केलाय.

आजपासून ३ दिवस हा अलर्ट देण्यात आलाय.

मागील ३ दिवसांपासून जिल्ह्यातील काही ठिकाणी ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.

यामुळे मोठे नुकसान झाले नसले तरी येणारे ३ दिवस मात्र नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांसाठी एकच औषध निरीक्षक

यवतमाळ जिल्ह्यात औषध विक्री दुकानांची संख्या दोन हजारांवर आहेत तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन खात्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी असून जिल्ह्यात एकही औषधी निरीक्षक कार्यरत नाही,दोन्ही पदे रिक्त असून सहाय्यक आयुक्त औषधी यांच्याकडे अमरावती विभागाचा कारभार सोपविण्यात आलाय त्यामुळे दोन हजार औषध दुकानांची तपासणी करणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com