Snake And Rat Fight  Saam TV
देश विदेश

Rat Fights Snake : साप आणि उंदराचं घमासान युद्ध; जिंकलं कोण? पाहा थरारक VIDEO

उंदीराने सापाला पळवून लावल्याचा व्हिडिओ पाहिलात का?

साम टिव्ही ब्युरो

Snake And Mouse Fight : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. इंटरनेटवर प्राण्यांशी संबधित असे अनेक व्हिडिओ (Viral Video) आहेत. आजवर तुम्ही शिकार करणाऱ्या वाघाचे, मगरीचे किंवा सापाचे व्हिडिओ पाहिले असतील. पण कधी उंदीराने सापाला पळवून लावल्याचा व्हिडिओ पाहिलात का? ऐकून धक्का बसेल पण हे खरं आहे. (Rat Fights Snake Viral Video)

सोशल मीडियावर उंदराचं आणि सापाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरलं होत आहे. या व्हिडिओत उंदराने चक्क सापाला पळवून लावलंय. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक उंदीर सापासोबत युद्ध करताना दिसून येत आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. या सापाच्या तोंडात उंदराचं पिल्लू आहे. उंदीराचं पिल्लू फक्त करण्याच्या उद्देशाने या सापाने तोंडात घेतलं खरं मात्र, त्याचा सामना त्या पिल्लाच्या आईशी झाला.

आपल्या पिल्लाला मृत्युच्या जबड्यात पाहून या उंदरानं चक्क सापासोबतच पंगा घेतला. कुठल्याही परिस्थितीत आपल्या पिल्लाला सापाच्या तावडीतून बाहेर काढायचं असं ठरवून या उंदराने चक्क सापासोबत झुंज दिली. हा साप जेव्हा पळ काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा हा उंदीर सापाची शेपटी धरून त्याला मागे खेचत होता. सापाच्या शेपटीला वारंवार चावा घेत हा उंदीर आपल्या पिल्लाला सोडवण्याचा प्रयत्न करत होता. (Rat And Snake Fights Viral Video)

दरम्यान, काही सेकंदाच्या या युद्धानंतर साप हार मानून आपल्या तोंडात पकडलेल्या उंदराच्या पिल्लाला सोडून देतो आणि तेथून पळ काढतो. पळ काढल्यानंतरही हा उंदीर सापाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो. उंदीर आणि सापाच्या घमासान युद्धाचा 30 सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT