Sukhdev Singh Gogamedi Saam Tv
देश विदेश

Sukhdev Singh Gogamedi: करणी सेनेच्या अध्यक्षांच्या हत्येचा CCTV Video आला समोर, लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली हत्येची जबाबदारी

Viral Video: मंगळवारी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Satish Kengar

Sukhdev Singh Gogamedi Shot Dead CCTV Video :

राजस्थानमध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक मोठी घटना घडली आहे. मंगळवारी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जयपूरच्या श्याम नगर येथील त्याच्या घरी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

ज्यामध्ये ते एका सोफ्यावर आरामात बसल्याचं दिसत आहे. याचवेळी तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर गोगामेडी यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कपड्याच्या दुकानात काम करत होता हल्लेखोर

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांपैकी एक नवीन सिंह शेखावत हा जयपूरच्या शाहपुरा येथील रहिवासी होता. तो एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. क्रॉस फायरिंगमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर दोन हल्लेखोर स्कूटरवरून पळून गेले. हल्लेखोरांना गोगामेडी हे आधीपासून ओळखत असल्याचे बोलले जात आहे. जे सीसीटीव्ही फुटेजवरूनही दिसून येत आहे. (Latest Marathi News)

रोहित गोदाराने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य रोहित गोदाराने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोगामेडी यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रारही देण्यात आली होती. रोहित गोदरा हा दुबईत राहत असून तो लॉरेन्स गँगसाठी काम करतो. दरम्यान, रोहित गोदारा कपुरीसरच्या नावाने एक पोस्टही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, आम्ही ही हत्या घडवून आणली आहे.

दरम्यान, 2006 मध्ये करणी सेना अस्तित्वात आली. वर्ष 2021 मध्ये राजपूत समाजाच्या दोन मोठ्या संघटना राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि श्री राजपूत करणी सेना यांचे विलीनीकरण करण्यात आले. यानंतर ही संघटना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना म्हणून ओळखली जाऊ लागली. सुखदेव सिन गोगामेडी त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. पद्मावत चित्रपटाला विरोध केल्याने करणी सेनाही चर्चेत आली होती. त्यावेळी करणी सेनेने या चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाक कापण्याची धमकीही दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT