Sukhdev Singh Gogamedi News: करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या, घटनेनंतर संपूर्ण शहरात नाकाबंदी

National president of Rashtriya Rajput Karni Sena shot dead : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Rajasthan Crime News
Rajasthan Crime NewsSaam tv
Published On

Karni Sena Sukhdev Singh Gogamedi:

राजस्थानच्या जयपुरातून खळबळजनक वृत्त हाती आलं आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयपूरच्या श्याम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना मेट्रो मास रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गोगामडी यांच्या गोळीबार झाल्यानंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajasthan Crime News
Bihar Crime News: धक्कादायक! जमिनीचा वाद विकोपाला गेला, भांडणानंतर ५ जणांना ट्रॅक्टरने चिरडलं

गोगामडी यांच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या. गोगामडी हे त्यांच्या श्यामनगर येथील राहत्या घरात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गोगामडी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिसरात मोठ्या संख्यने लोक जमली होती. गोगमडी यांच्यावर नेमका कोणी गोळीबार केला, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही

कोण आहेत गोगामडी?

सुखदेव सिंह गोगामडी हे अनेक वर्षांपासून राष्ट्रीय करणी सेनेशी जोडले गेलेले आहेत. त्यांचे करणी सेनेशी अंतर्गत वाद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची स्थापना केली. या करणी सेनेचे ते अध्यक्ष होते . पद्मावत आणि गॅगस्टर आनंदपाल एनकाऊंटर प्रकरणानंतर गोगामडी चर्चेत आले होते.

Rajasthan Crime News
Telangana New CM: ठरलं तर! रेवंथ रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; कधी घेणार शपथ?

करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन अलर्ट

सुखदेव सिंह यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस अलर्ट झाले आहेत. तसेच इतर शहरातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

करनी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर कोणी गोळीबार केला, याबद्दल माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुखदेव सिंह हे पोलिसांकडून सुरक्षेची मागणी करत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com