Ramdev Baba Saam Digital
देश विदेश

Ramdev Baba : रामदेव बांबांचा सुप्रीम कोर्टाला नमस्कार, कोर्टही म्हणालं, आमचाही प्रणाम! पण...

Supreme Court : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांना कोर्टाने वैयक्तिक हजेरीतून सूट दिली आहे, मात्र कोर्टाच्या अवमान प्रकरणी खटला चालवला जाणार की नाही याचा आदेश राखून ठेवला आहे.

Sandeep Gawade

ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. रामदेव बाबा यांना कोर्टाने सुनावणीत वैयक्तिक हजेरीतून सूट दिली आहे. मात्र न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोत कोर्टाच्या अवमान प्रकरणी खटला चालवला जाणार की नाही याचा आदेश राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी रामदेव बाबांनी न्यायमूर्तींना प्रणाम केला. त्यावर न्यायमूर्ती अमानुल्लाह यांनीही आमचाही प्रणाम असल्याचं म्हटलं.

न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष आरव्ही अशोकन यांना सांगितले की, "सोफ्यावर आरामात बसून आणि प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवू शकत नाही. IMA अध्यक्ष आरव्ही अशोकन यांनी 'पीटीआय'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात दिलेल्या विधानाबद्दल खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली आहे.

सुप्रीम कोर्टाने पतंजलीलाच्या औषधांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत त्या उत्पादनांची विक्री थांबवण्यासाठी आणि मार्केटमधून ही उत्पादने परत मागवण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदे दिले आहेत. सांगितले. यावर न्यायालयाने तीन आठवड्यांत उत्तर मागितलं आहे. न्यायालयाचा उद्देश एवढाच आहे की लोकांनी सतर्क राहावं. बाबा रामदेव यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे. त्यांनी त्यांचा सकारात्मक वापर केला पाहिजे. बाबा रामदेव यांनीही जगभरात योगाच्या प्रचारात योगदान दिलं असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी सर्व राज्यांना प्रश्न केले. तसंच काही सूचनाही केल्या. कोणत्या कोणत्या राज्यांनी शपथपत्र दाखल केलं आहे, याचीही विचारणा केली. सर्व राज्य सरकारांनी लक्षात ठेवावे की तक्रार नोंदवल्यास कारवाई तात्काळ कारवाई करण्यात यावी. तक्रार दाखल केली नसली तरीही, तरीही त्या उत्पादनाची दिशाभूल करणारी म्हणून जाहिरात केली जात आहे की नाही हे तपासण्याच्या सूचनाही न्यायालयाने राज्यांना केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT