कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आली आहे. या धमकीनंतर राम मंदिर आणि इतर महत्त्वाच्या आस्थापना आणि संस्थांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अयोध्येचे एसएसपी राजकरन नय्यर यांनी स्वतः मंदिर आणि अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. परिसरात सुरक्षा दलांची गस्त त्यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
एसएसपी राजकर नय्यर यांनी दहशतवादी संघटनेच्या धोक्याबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. मात्र अयोध्येतीलर राम मंदिराची सुरक्षा आधीच कडेकोट असून त्याची वेळोवेळी तपासणी केली जाते असं म्हटलं आहे. त्याच अनुषंगाने आजही मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अयोध्या धामच्या सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत संपूर्ण शहराची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक विभागाची जबाबदारी वरिष्ठ राजपत्रित अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
राम मंदिर संकुलात सर्व ठिकाणी सुरक्षा दलांचा खडा पहारा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांव्यतिरिक्त पीएसी दलांचाही सहभाग आहे. याशिवाय शहरातील इतर सर्व महत्त्वाच्या आस्थापना आणि संस्थांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने रिअल टाईम इनपुट जनरेट होत असून त्या आधारे आवश्यक व्यवस्था व तयारी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
पाकिस्तानी कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने अयोध्येत बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली या. या धमकीनंतर संपूर्ण अयोध्या शहरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. अयोध्या शहराची आणि मंदिराची सुरक्षा अभेद्य आहे. तरीही कोणत्याही दहशतवादी संघटनेचा धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे अयोध्येतील श राम मंदिराची सुरक्षा अधिक कडक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.