NEET Exam Grace Mark: ग्रेस मार्क्स रद्द केल्याप्रकरणी CBI करणार तपास, NTA आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस

Supreme Court On NEET Exam Grace Mark: नीट परीक्षेच्या निकालाच्या विरोधातील वाद विद्यार्थी पातळीवरून सुरू होऊन 7 उच्च न्यायालयांनंतर आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. ८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
NEET Exam: ग्रेस मार्क्स रद्द केल्याप्रकरणी CBI करणार तपास, NTA आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस
NEET ExamSaam Digital
Published On

राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा 2024 (NEET Exam 2024) मुळे NTA ही परीक्षा आयोजित करणारी संस्था सध्या चर्चेत आली असून तिच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. NEET 2024 चा निकाल जाहीर झाल्यापासून संस्था वादाच्या भोवऱ्यामध्ये साडपली आहे. निकालाच्या विरोधातील वाद विद्यार्थी पातळीवरून सुरू होऊन 7 उच्च न्यायालयांनंतर आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायालयामध्ये एनटीएने ग्रेस मार्क्स देण्यात आपली चूक मान्य केली आणि ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांचे पुन्हा पेपर घेण्याची घोषणा केली.

ग्रेस मार्क्स काढून पुन्हा पेपर देण्याचा पर्याय देऊन एनटीएनेच आपली चूक शांतपणे मान्य केली आहे. पेपर लीक प्रकरणी सीबीआय तपासाच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने पुढील तारीख 8 जुलै दिली आहे. आज 7 अर्जांवरील सुनावणीत न्यायालयाने एनटीए आणि केंद्र सरकारकडून उत्तरे मागवली आहेत. पेपर लीकच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्यास सांगितले आहे आणि एनटीए आणि केंद्राला नोटीसही बजावण्यात आली आहे.

NEET Exam: ग्रेस मार्क्स रद्द केल्याप्रकरणी CBI करणार तपास, NTA आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस
NEET Exam : NEET वरून सुप्रीम कोर्टाचा यू-टर्न; 1563 विद्यार्थ्यांचीही होणार फेरपरीक्षा

एनटीएवरील आरोप -

- NEET चा पेपर असल्याचा आरोप.

- पेपरफुटीच्या दाव्यांकडे लक्ष न दिल्याचा आरोप

- परीक्षा व्यवस्थित न घेतल्याचा आरोप

- गुप्तपणे निर्णय घेण्याचा आरोप (उदा. ग्रेस मार्क्स देणे)

- चूक पकडल्यावर ग्रेस मार्क्स देणे चूक झाल्याचे सांगितले

NEET Exam: ग्रेस मार्क्स रद्द केल्याप्रकरणी CBI करणार तपास, NTA आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस
NEET-UG 2024 Scam: NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ग्रेस मार्क्सवर सुनावणी घेतल्यानंतर NEET प्रवेश परीक्षा प्रकरणी सीबीआयशी संबंधित याचिकेवर एनटीए आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली. सीबीआय तपासाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ८ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेची आणि सखोल चौकशीची मागणी केली होती. काही विद्यार्थ्यांनी जंतरमंतर येथे “24 लाख विद्यार्थ्यांना परीक्षा हव्या आहेत, घोटाळा नको” आणि पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी अशा घोषणा देत निदर्शने केली होती.

NEET Exam: ग्रेस मार्क्स रद्द केल्याप्रकरणी CBI करणार तपास, NTA आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस
Neet Result Controversy: ब्रेकिंग! नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com