raksha bandhan 2023 seven children drowned in yamuna river four died in Uttar Pradesh Banda District Saam TV
देश विदेश

Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाच्या दिवशीच मोठी दुर्घटना; यमुना नदीत बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू

Uttar Pradesh News: बांदा येथे यमुना नदीच्या पाण्यात बुडून ४ मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Satish Daud

Uttar Pradesh News: देशभरात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक बहिणी लाडक्या भावांना राखी बांधून त्यांच्याकडून आपल्या संरक्षणाचे वचन घेत आहेत. अशातच उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. बांदा येथे यमुना नदीत कजारियाचे विसर्जन करण्यासाठी गेलेली ७ मुले पाण्यात बुडाली. यातील ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

तर ३ जणांचा वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले असून अद्यापही एका मुलाचा शोध घेणे सुरू आहे. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुली आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यातील पैलानीच्या गुडगाव परिसरात ही घटना घडली. रक्षाबंधनाचा सण असल्याने गावातील काही शाळकरी मुले यमुना नदीच्या काठी कजरिया विसर्जनासाठी गेली होती. यावेळी काही मुले पाण्यात उतरली.

दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने मुले अचानक बुडू लागली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी तातडीने पाण्यात उड्या घेत मुलांचा शोध घेतला. यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आलं. मात्र, ४ मुलांचा बुडून मृत्यू झाला.

बुडालेल्या ४ मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. अजूनही एक मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशीच गावातील ४ शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिकचा तपास केला जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT