राज्यसभेच्या रिक्त ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे. १० राज्यांमधील या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर मतदानाच्या दिवशीच संध्याकाली मतमोजणी होणार आहे. (Rajya Sabha Elections 2026: Polls for 37 Seats on March 16 Across 10 States)
एप्रिल २०२६ मध्ये राज्यसभेच्या ३७ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुका घेतल्या जात आहेत. या निवडणुकीची अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी निघणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी (१६ मार्च) पूर्ण केली जाईल.
पुढील महिन्यात १६ मार्च रोजी राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा, हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये या जागा रिक्त होत आहेत. रिक्त होणाऱ्या जागांमध्ये सर्वाधिक ७ जागा महाराष्ट्रातील आहेत तामिळनाडूमध्ये सहा आणि बंगालमध्ये रिक्त होणाऱ्या पाच जागांसाठीही मतदान होणार आहे. शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि इतर अनेक नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे.
१० राज्यांमध्ये रिक्त होणाऱ्या ३७ राज्यसभेच्या जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. त्याच दिवशी मतमोजणी होईल, असे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. अनेक खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. या ३७ जागांसाठी अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल. ५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. उमेदवार ९ मार्चपर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतात. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.