Sakshi Sunil Jadhav
फ्रीजमधलं पाणी खूप थंड असल्यामुळे शरीरावर अचानक तापमानाचा धक्का बसतो. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड असल्याने शरीरासाठी सुरक्षित असतं.
जास्त थंड पाणी पचनक्रिया मंद करतं आणि अपचनाची समस्या वाढवते. माठाचं पाणी पचन सुधारण्यास मदत करतं आणि पोट हलकं ठेवतं.
फ्रीजमधलं पाणी सारखं पित राहिल्याने घसा खवखवतो. माठातील पाणी घशासाठी सौम्य आणि कमी त्रास देणारं असतं. जे सहज गिळता येतं.
जास्त थंड पाणी शरीराची ऊर्जा कमी करू शकतं कारण शरीराला तापमान संतुलित करावं लागतं. माठातलं पाणी शरीराला नैसर्गिक थंडावा देतं आणि ऊर्जा टिकवून ठेवतं.
फ्रीजचं पाणी पटकन प्यायल्याने तहान पूर्ण भागत नाही आणि सारखी तहान लागते. पण माठाचं पाणी हळूहळू पिल्याने शरीर जास्त हायड्रेट होतं.
फ्रीजमधलं पाणी फक्त थंड असतं, त्यात जास्त फायदे नसतात. माठातलं पाणी मातीच्या संपर्कामुळे थोडी नैसर्गिक खनिजे देतं.
जास्त थंड पाणी सर्दी, खोकला किंवा घसा दुखण्याचा धोका वाढवू शकतं. माठाचं पाणी या त्रासांपासून तुलनेने सुरक्षित ठेवतं.
फ्रीजमधलं पाणी शरीराच्या तापमान संतुलनावर परिणाम करू शकतं. माठाचं पाणी शरीराशी समतोल राखतं आणि सहज स्वीकारलं जातं.
खूप उष्णतेत थोड्या प्रमाणात थंड पाणी चालू शकतं, पण जास्त टाळा. दररोजच्या वापरासाठी माठातीलं पाणी हा सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे.