Summer Health: तापमान वाढलंय! उन्हाळ्यात काय करावं, काय टाळावं? आरोग्य विभागाने सांगितल्या सोप्या टिप्स

Sakshi Sunil Jadhav

उष्णतेच्या लाटा

सकाळचे १० वाजले की घामाच्या धारा लागायला सुरुवात होते. त्यामुळे या दिवसात सगळ्यांनीच विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

summer health tips India

डॉक्टरांचे महत्वाचे आवाहन

पुढे आवाहन आरोग्य विभागाकडून काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी पुढे काही टिप्स दिल्या आहेत.

summer health tips India

भरपूर पाणी प्या

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे.

heat stroke prevention

शरीरातले क्षार

ओआरएस, लिंबूपाणी आणि ताकाचा वापर करा. कारण उन्हामुळे शरीरातले क्षार कमी होतात. त्यामुळे ORS, लिंबूपाणी आणि ताक फायदेशीर ठरतं.

dehydration prevention

फळांचा आहार वाढवा

कलिंगड, टरबूज, द्राक्षे, संत्री यांसारखी पाण्याने समृद्ध फळं खा. जमल्यास रोज नारळपाणी पित राहा.

heatwave guidelines India

सुती कपडे घाला

सैल, हलक्या रंगाचे आणि सुती कपडे घाला. त्याने शरीर थंड राहतं.

loose cotton clothes

डोकं आणि डोळ्यांचे संरक्षण करा

बाहेर पडताना टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करा. पण दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका.

summer wellness guide

तेलकट आणि जड पदार्थ

उन्हाळ्यात हलका आणि पचायला सोपा आहार घ्या. त्यात पाण्याचा वापर जास्त करा.

heat exhaustion symptoms

अस्वस्थता जाणवली तर?

चक्कर, थकवा, डोके दुखणे किंवा उलट्या वाटल्यास लगेच सावलीत जाऊन विश्रांती घ्या.

heat exhaustion symptoms

NEXT: नागपूरजवळची 'ही' थंड हवेची ठिकाणं माहितीयेत का? उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा पाहाच...

Nagpur Summer Tourism | google
येथे क्लिक करा