देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान.
भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी दिली.
बिहारमधील पाच राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे.
देशातील विविध राज्यांमधील ३७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत फक्त एक दिवस शिल्लक आहे. आज आणि ४ मार्च रोजी होळीची सुट्टी असणार असल्याने त्यामुळे नामांकन फक्त ५ मार्चपर्यंत दाखल करता येईल. याच दरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान बिहारमधील ५ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे, यामध्ये राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह, उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर, प्रेमचंद्र गुप्ता, अमरेंद्र धारी सिंह यांचा समावेश आहे. हरिवंश आणि रामनाथ ठाकूर हे जेडीयूचे, प्रेमचंद्र गुप्ता आणि अमरेंद्र धारी हे आरजेडीचे आणि उपेंद्र कुशवाह हे आरएलएसपीचे आहेत.
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नितीन नबीन यांना पक्षाने बिहारमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले आहेत. त्यांच्या नावाची घोषणा ही बिहारच्या राजकारणात भाजपसाठी एक महत्त्वाची रणनीती म्हणून पाहिली जात आहे. नितीन नबीन यांच्या व्यतिरिक्त भाजपने बिहारमधून शिवेश कुमार यांनाही उमेदवारी दिली आहे.
बिहारमध्ये एनडीएने राज्यसभेसाठी पाचवा उमेदवार उभा केला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्याकडे स्वतःच्या बळावर चार उमेदवार निवडून आणण्याचे बहुमत आहे, परंतु उपेंद्र कुशवाह यांना पाचवा उमेदवार म्हणून उभे करून त्यांनी ही स्पर्धा रंजक बनवलीय. जेडीयूने बिहारमध्ये नितीश कुमार यांचा मुलगा निशांत याला उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राजकारणात आणण्याचे प्रयत्न बऱ्याच काळापासून सुरू आहेत. आता जेडीयूची रणनीती यशस्वी होताना दिसतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.