Rajkot Airport incident:  Saam tv
देश विदेश

Rajkot Airport incident: देशात चाललंय काय? दिल्लीनंतर गुजरातमध्येही मोठी दुर्घटना, विमानतळाचं छत कोसळलं

Rajkot Airport incident after delhi : दिल्लीनंतर गुजरातमध्ये विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळाचं छत कोसळल्याची घटना घडली आहे

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळी झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. काल मुसळधार पावसादरम्यान, दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाचं छत कोसळल्याची घटना घडली. छताचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कॅब ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अशीच एक दुर्घटना गुजरातमध्येही घडली आहे.

गुजरातमध्ये राजकोट विमानतळाचं छत कोसळल्याची घटना घडली आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळाच्या टर्मिनल बाहेरील पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप भागात छत कोसळल्याची घटना घडली आहे. या छताखाली कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. राजकोटमधील या छताखाली कोणीही नव्हतं, अन्यथा दिल्लीसारखी घटना घडली असती, असं बोललं जात आहे.

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-१ चं छत कोसळून एका कॅब ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले. छत कोसळल्यानंतर अनेक कार दबल्या गेल्या. कारवर छताचे लोखंडाचे बीम कोसळले, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. छत कोसळल्यानंतर लोकांनी एकच आरडाओरड सुरु केली होती.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्येही मुसळधार पावसामुळे डुमना विमानतळाचा छताचा भाग कोसळला. छताचा भाग कोसळल्यानंतर एक दबली गेली होती. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता ही दुर्घटना घडली. पावसामुळे या छतावर पाणी साचलं होतं. पाणी साचलेलं छत कोसळलं. त्यानंतर हे छत कारवर कोससळलं.

दरम्यान, दिल्ली विमानतळाचं छत कोसळल्यानंतर एक जणाचा मृत्यू झाला होता. तर काही जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर विमानतळाचं स्ट्रक्चरल ऑडिटचा आदेश देण्यात आला आहे. दोन ते पाच दिवसांत निरीक्षण करून नागरी उड्डाण मंत्रालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT