Rahul Gandhi Tweet on Rajiv Gandhi Birth Anniversary Saamtv
देश विदेश

Rahul Gandhi News: 'पापा, आपके निशान मेरा रास्ता हैं…' वडिलांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक; लडाखमधून वाहिली आदरांजली

Rahul Gandhi Tweet On Rajiv Gandhi Birth Anniversary: मी भारतमातेचा आवाज ऐकतो आहे.." असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हणले आहे.

Gangappa Pujari

Rajiv Gandhi Birth Anniversary: देशाचे माजी पंतप्रधान कॉंग्रेस नेते राजीव गांधी आज जयंती. देशभरात राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले जात आहे. राजीव गांधी यांचे सुपूत्र आणि कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही वडिलांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली. ट्वीट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांची ही भावूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

कॉंग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या लेह- लडाखच्या दौऱ्यावर आहेत. लडाखमधील पैंगा त्से झील तलावाच्या किनाऱ्यावर त्यांनी राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या फोटोला अभिवादन केले. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

"बाबा, तुमच्या डोळ्यात भारतासाठी स्वप्न होती. या अनमोल आठवणींमधून ती स्वप्न दिसतात. तुमच्या खुणा आता माझा मार्ग आहेत. प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि त्यांच्या स्वप्नांना मी समजून घेत आहे. मी भारतमातेचा आवाज ऐकतो आहे.." असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हणले आहे. सोबतच त्यांनी वडिलांचा एक खास व्हिडिओही शेअर केला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जावून त्यांना आदरांजली अर्पण केली. तसेच कॉंग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुनही राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले आहे. "भारताच्या सर्वात तरुण पंतप्रधानांना आमची मनापासून श्रद्धांजली, ज्यांनी देश कायमचा बदलला.." असे या ट्वीटमध्ये म्हणले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT