राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याने काँग्रेस नेत्याची खोचक टीका Saam Tv
देश विदेश

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याने काँग्रेस नेत्याची खोचक टीका

पहा कोणी केली टीका

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवण्यात आले आहे,  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली, मोदींच्या या निर्णयावर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत, काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भात ट्वीट करुन पंतप्रधान मोदींवर उपहासात्मक टीका केली आहे.

हे देखील पहा-

दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, आधी अहमदाबादच्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केले. मला आश्चर्य वाटले, जेव्हा त्यांनी मेजर ध्यानचंद जीच्या नावे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव ठेवले, मला तर अपेक्षा होती ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील. यालाच इंग्रजीमध्ये Megalomania म्हणतात असे ट्वीट दिग्विजय सिंह यांनी केल्याने ते चर्चेत आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत याची घोषणा केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाला संदेश दिला आहे.  "राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या भावनांचा आदर म्हणून आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले जात आहे."  

Edited By- Ashwini Jadhav- Kedari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: बोलके डोळे अन् हसरं सौंदर्य, वैदेहीचे फोटो पाहून नजर लागेल

Maharashtra Live News Update:अंबरनाथ रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीवर प्रवाशांना तिकीट नाकारले जात आहे.

Marathi Actress: बोलक्या डोळ्यांच्या या अभिनेत्रींना ओळखलं का? हे फोटो एकदा पाहा

Nashik Tourism : हिवाळ्यात ट्रेकिंग करायला आवडतं? मग 'हे' ठिकाण तुमच्यासाठी ठरेल बेस्ट

राज ठाकरेंनी ‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशीला सुनावलं; एकाच ठिकाणी राहा|VIDEO

SCROLL FOR NEXT