Crime  Saam Tv
देश विदेश

वडील अन् बायकोचे अनैतिक संबंध पतीनं रंगेहाथ पकडलं; नंतर क्रुर कृत्य उघड

राजस्थान मधील अलवरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजस्थान : राजस्थान मधील अलवरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुनेशी अनैतिक संबंध असल्यामुळे वडिलांनी मुलाची हत्या केली आहे. वास्तविक, व्यापारी असलेले वडील रात्री आपल्या सुनेला भेटायला आले होते. यादरम्यान मुलाने आपल्या वडिलांना आपल्या पत्नीबरोबर आक्षेपार्ह अवस्थेमध्ये बघितले होते. यामुळे तरुण चांगलाच संतापला आणि रागाच्या भरात आपल्या खोलीत गेला. मुलाच्या या कृत्याने सासरे आणि सून घाबरले होते. (Rajasthan The immoral relationship between father wife caught by husband)

यानंतर दोघेही मुलाच्या मागे गेले आणि त्याच्या खोलीमध्ये पोहोचले. सासरा आणि सुनेने गळा आवळून तरुणाचा खून केल्याचे पोलिसाच्या तपासात आढळून आले आहे. हे संपूर्ण प्रकरण अलवरच्या बहरोड येथील आहे. अलवर जिल्ह्यामधील बहरोड़ येथे ३ दिवसाअगोदर झालेल्या एका व्यावसायिकाच्या हत्येचे प्रकरण पोलिसांनी (police) उघड केले आहे. पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सून आणि सासरे यांना मुलाने संशयास्पद अवस्थेमध्ये बघितले असल्याचे पोलिसांचे सांगणे आहे.

हे देखील पहा-

यानंतर दोघांनी मिळून त्याची हत्या केली आहे. सासरा आणि सुनेचे होते अनैतिक संबंध, पतीने ते पाहिल्याने जीव गमावला आहे. अतिरिक्त एसपी नीमराना विपिन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, मृत विक्रम सिंहचे वडील आणि त्यांच्या पत्नीचे अवैध संबंध होते. मृताने वडील आणि पत्नीला संशयास्पद अवस्थेमध्ये बघितल्यानंतर दोघांनी मिळून त्याचा खून केला. एएसपी विपिन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ५ मार्च रोजी विक्रम सिंह पत्नी आणि मुलांबरोबर जेवण करून झोपले होते. सकाळी पत्नीने पती विक्रम सिंह याला बेडवरून खाली पाडले आणि आरडा- ओरडा सुरू केला. (Rajasthan The immoral relationship between father wife caught by husband)

यानंतर मृताचे वडील बलवंत सिंग आणि इतर कुटुंबीयांनी विक्रम सिंगला बेडवरून उचलून रुग्णालयात (hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. यानंतर मृताचे नातेवाईक गुपचूप त्याच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत होते. मात्र, त्या अगोदरच एका फोनने संपूर्ण रहस्य उघड केले आहे. अतिरिक्त एसपीने दिलेल्या माहितीनुसार की, मृतदेह ताब्यात घेतल्यावर शवविच्छेदन करण्यात आले होते. तेव्हा अहवालामध्ये मानेवर सार्डिनच्या खुणा आणि डोक्याला मार लागल्याच्या खुणा आढळले आहे. मृताच्या पत्नी पूजाची कडक चौकशी करण्यात आली. तिने सर्व गुपित उघड केले आहे.

वास्तविक, बळवंत यांच्या पत्नीचे २०२० मध्ये निधन झाले आहे. यानंतर त्याचे आपल्या सुनेशी अनैतिक संबंध होते. अपघाताच्या रात्री मयत विक्रमने वडील बळवंत आणि पत्नी यांना संशयास्पद अवस्थेत बघितले होते. केस उघडण्याच्या भीतीने बलवंत सिंग आणि सून पूजा यांनी विक्रम सिंगचा ओढणीने गळा दाबला आणि त्याला आत्महत्या भासवण्यासाठी पंख्याला लटकवले होते. याप्रकरणी सध्या पोलिसांनी (police) दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT