Thrilling Accident Video Saam Tv News
देश विदेश

Thrilling Accident Video : रस्ता ओलांडताना वाहनाची धडक, २० फूटवर उडून खाली कोसळला; कारच्या मागच्या कॅमेऱ्यात थरारक VIDEO कैद

Accident Thrilling Video : राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात झालेल्या एका दुर्दैवी अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला धडक दिल्याचे दिसून येतं.

Prashant Patil

सिकर : राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील नीमकथाना भागातील सदर पोलिस स्टेशन हद्दीतील चौकडी रस्त्यावर ३ दिवसांपूर्वी झालेल्या एका रस्ते अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला. या घटनेचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की अज्ञात वाहनाची धडक इतकी जोरदार होती की रस्ता ओलांडणारा व्यक्ती हवेत फेकला गेला आणि सुमारे २० फूट अंतरावर पडला. जवळच्या लोकांनी गंभीर अवस्थेत असलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अज्ञात वाहनाच्या पुढे जाणाऱ्या कारच्या मागच्या कॅमेऱ्यात या घटनेचा व्हिडिओ कैद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळा येथील रहिवासी सुभाष जोशी हे चौकडी रस्त्यावरील त्यांच्या वीटभट्टीवरून घरी चालत जात होते. रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ती व्यक्ती सुमारे २० फूट अंतरावर पडली. घटनेनंतर चालक वाहन घेऊन पळून गेला. लोकांनी जखमींला खासगी वाहनाने नीमकथाना रुग्णालयात पाठवलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT