देश विदेश

Shocking Accident: काळीज पिळवटणारी घटना! बायकोचं अपघाती निधन, मृतदेहाला कवेत घेऊन नवऱ्याने फोडला टाहो

rajasthan Accident News: मंगळवारी पाली जिल्ह्यातील बांगड रुग्णालयात हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. जिथे एक पती रडत पत्नीच्या मृतदेहाजवळ बसला होता. तर सुरक्षारक्षकांनी त्याला सांत्वन दिले.

Dhanshri Shintre

पतीने आपल्या आयुष्याचं सर्वस्व गमावलं अशी ही हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. पाली जिल्ह्यातील बांगड रुग्णालयात मंगळवारी संध्याकाळी अशी एक वेदनादायक घटना घडली की तिथे असलेल्या लोकांचे डोळे पाणावले. देवराम मेघवाल, बिरामी येथील रहिवासी, आपल्या पत्नी सीता देवीसोबत बँकेच्या कामासाठी संदेराव येथे गेले होते.

काम आवरुन दोघेही दुचाकीवरून घरी परतत होते. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. संदेरावजवळील एका हॉटेलसमोर अचानक एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या अपघातात सीता देवी गंभीर जखमी झाल्या. देवरामला एका क्षणात जीवन उद्ध्वस्त होणार असल्याचं ठाऊक नव्हतं.

देवरामने आपल्या जखमी पत्नीला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्याने घटनास्थळावरून दोनदा रुग्णवाहिकेला फोन केला. पण कोणतीच रुग्णवाहिका आली नाही. शेवटी त्याने एका टेम्पोवाल्याला थांबवून विनंती केली आणि आपल्या जखमी पत्नीला त्यातच रुग्णालयात नेले.

प्रथम सँडराव रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी उपचार करून तिला पाली येथील बांगड रुग्णालयात रेफर केले. मात्र नशिबाने साथ सोडली. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले सीता देवी आता या जगात नाहीत. त्याने आपल्या पत्नीच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली आणि थरथरत रडू लागला. तो आवाज ऐकून रुग्णालयातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले.

बांगड रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि उपस्थित नागरिकांनी देवरामला धीर दिला. पण त्याच्या दु:खावर शब्द नव्हते. आठ वर्षांपूर्वी बलाना येथील सीता देवीशी विवाहबंधनात अडकलेल्या देवरामच्या जीवनात आनंद होता. दोन लहान मुले होती, नवजीवनाचे स्वप्न होते. मात्र, एका क्षणात सारे स्वप्न भंगले. मंगळवारी सकाळी जेथे कामासाठी रवाना झाले होते. तेथून संध्याकाळी पत्नीचा मृतदेह घेऊन घरी परतावे लागले.

या दुर्घटनेमुळे बिरामी गावात शोककळा पसरली आहे. घरातील लहान मुलांचे रडणे आणि देवरामचा मुका आक्रोश वातावरण पिळवटून टाकत आहे. पत्नीचा हात धरून आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्या एका साध्या कामगाराचं आयुष्य आता रिकामं झालं आहे आणि या घटनेने संपूर्ण परिसरात हृदय पिळवटणारा शोककल्लोळ पसरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT