Rajasthan Accident News AI Image
देश विदेश

Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

Rajasthan Accident News : राजस्थानमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू.

Alisha Khedekar

  • राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील आबूरोड परिसरात भीषण रस्ते अपघात

  • मंगळवारी रात्री मावल कटजवळ ट्रकने दुचाकीला जोरदार धडक

  • दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तीन तरुणांचा या अपघातात मृत्यू

राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, आबूरोड परिसरात घडलेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री रीको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मावल कटजवळ हा अपघात घडला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तिघांना आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एक ट्रक आबूरोड येथून पालनपूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी मावल कटजवळ ट्रकने समोरून नव्हे, तर त्याच दिशेने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवर तीन तरुण प्रवास करत होते. धडक इतकी जोरदार होती की तिघेही रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच रीको पोलीस ठाण्याचे अधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणांना तातडीने रुग्णवाहिकेतून आबूरोड येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात ठेवले. विशेष म्हणजे, तिन्ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची नावे आणि पत्ते शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून ट्रक आणि चालकासंदर्भातील माहिती गोळा केली जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचाही शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळा ३५००० रुपयांनी महागले; वाचा २२ आणि २४ कॅरटचे दर

तुम्ही मार्गदर्शन करा, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू; पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकी काय झाली चर्चा?

Maharashtra News Live Update : 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी 5000 जमा

Bhai Dooj 2026: 10 की 11 नोव्हेंबर, कधी आहे भाऊबीज? लगेच कन्फ्यूजन दूर करा आणि जाणून घ्या शुभ मुहूर्त

Toothbrush Swallowed: सकाळी दात घासताना थेट टूथब्रश गिळला! ५० वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराने डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT