Ashok gehlot news  saam tv
देश विदेश

राजस्थानमधील काँग्रेसच्या राजकीय नाराजीनाट्यातून अशोक गेहलोत यांना क्लीन चीट? चर्चांना उधाण

नाराजीनाट्यावर राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिखित स्वरुपात रिपोर्ट सादर केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे

Rajasthan Political crisis : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सुरू झालेल्या राजस्थानमधील नाट्यमय राजकीय घडामोडींकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. काल, सोमवारी राजस्थानमधील नाराजीनाट्यावर काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) नाराज झाल्या होत्या. राजस्थानमध्ये नाट्य करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाई करणार असल्याची चर्चा आहे. तर याच नाराजीनाट्यावर राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिखित स्वरुपात रिपोर्ट सादर केला आहे. राजस्थानमधील राजकीय नाराजीनाट्यात अशोक गेहलोत यांना क्लीन चीट मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Rajastan Political News In Marathi )

राजस्थानमधील नाराजीनाट्यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी नाराज झाल्या होत्या. काँग्रेसने अशोक गेहलोत (Ashok Gahlot) यांचे निकटवर्तीय शांती धारीवाल ,महेश जोशी आणि धर्मेंद्र राठौर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शांती धारीवाल यांनी पक्षाने बोलावलेल्या बैठकीच्या व्यतिरिक्त बैठक बोलावली होती. तसेच या बैठकीतील आमदारांच्या जेवणाची सोय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केल्याची चर्चा आहे. राजस्थानमधील आमदारांच्या बंडामागे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असल्याचीही चर्चा आहे. याच घटनेनंतर राजस्थानमधील (Rajsthan) राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, सदर पार्श्वभूमीवर राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांनी आज, मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिखित स्वरुपात रिपोर्ट सादर केला. तर राजस्थानमधील राजकीय नाराजीनाट्यात अशोक गेहलोत यांना क्लीन चीट मिळाल्याची चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, सोमवारी अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजस्थानमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांची १० जनपथवर भेट घेतली. त्यामुळे राजस्थानचा मुख्यमंत्री बदलला जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

SCROLL FOR NEXT