Woman Cop Violating Traffic Rules on Busy Highway Saam
देश विदेश

मैत्रिणींसोबत पिकनिकला गेली, हायवेवर पोलीस महिलेने बेधुंद डान्स केला, VIDEO मुळे उडाली खळबळ

Woman Cop Violating Traffic Rules on Busy Highway: व्हायरल व्हिडिओमध्ये राजस्थान पोलिसांची महिला कॉन्स्टेबल हायवेवर वाहन थांबवून मैत्रिणींंसोबत नाचताना दिसत आहे.

Bhagyashree Kamble

राजस्थान पोलीस दलात तैनात असलेल्या प्रियांका शेखावत यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्या वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन करत असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जनतेत आणि पोलीस विभागामध्ये चर्चा सुरू झाली आहे. तसेच काही नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओवर आता नेमकी कोणती काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..

व्हायरल व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल प्रियांका शेखावत तिच्या काही मैत्रिणींसोबत हायवेवर गाडी थांबवून नाचताना दिसत आहे. तर, हायवेवर इतर वाहने वेगाने जात असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, हायवेसारख्या वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारे थांबून नाचणे हे गंभीर अपघाताला आमंत्रण मानले जात आहे.

दरम्यान, थोडीशीही चूक झाल्यास मोठा रस्ता अपघात घडला असता, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. व्हायरल व्हिडिओमध्ये कोणतेही वाहतूक सुरक्षा उपाय किंवा कोणतीही खबरदारी न घेतल्याचे दिसून येते. पोलिसांकडूनच नियम धाब्यावर बसवले जात असल्यामुळे नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठे शूट करण्यात आला? स्थानाची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या जबाबदारी आणि शिस्तीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच संतापही व्यक्त केला. दरम्यान, राजस्थान सरकारचा पोलीस विभाग या प्रकरणात काय कारवाई करेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेच्या नियमात मोठे बदल; कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

Maharashtra Live News Update: विक्रोळीध्ये चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू; उपचार नाकारल्याचा आरोप करत हॉस्पिटलला घेराव

गायिका अंजली भारतीला दणका; अमृता फडणवीसांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार, राज्य महिला आयोगाकडून कारवाईसाठी पहिलं पाऊल

Anjali Bharati: अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अंजली भारती कोण आहे?

Dry Fruit Laddu Recipe: संध्याकाळी काम करताना लागलेल्या भूकेसाठी बनवा साखरे नसलेला टेस्टी आणि हेल्दी ड्राय फ्रूट लाडू

SCROLL FOR NEXT