Rajasthan News  Saam Tv
देश विदेश

Rajasthan News: रीलने घेतला जीव! तरुणाने 150 फूटांवरून खदानीत मारली उडी, पण बाहेर आलाच नाही; VIDEO व्हायरल

Rajasthan Youth Died After Jumps 150 Feet Into Mine: राजस्थानमध्ये रील्समुळे एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. या तरुणाने रील्स तयार करण्यासाठी १५० फूटांवरून खदानीत उडी मारली आणि त्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला.

Priya More

सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुण पिढी काहीही करायला तयार असते. रील्स तयार करण्यासाठी ते आपला जीव धोक्यात घालतात. कधी इमारतीवरून उडी मारून स्टंट, कधी चालत्या बाईकवर स्टंट, तर कधी पाण्यामध्ये स्टंट करून ते रील्स तयार करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण अशापद्धतीने रील्स तयार करणे हे अनेकांच्या जीवावर बेतते. अशीच एक घटना राजस्थानमध्ये (Rajasthan) घडली आहे. रील्स तयार करण्याच्या नादामध्ये एका तरुणाने आपला जीव गमावला आहे.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका तरुणाने रील्स तयार करण्यासाठी तब्बल १५० फूटांवरून खदानीत उडी मारली. या घटनेमध्ये खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली. दिनेश मीणा असं या तरुणाचे नाव आहे. उदयपूर शहरातील गोवर्धन विलास पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लाई गावामध्ये हा तरुण राहत होता. हा तरुण आपल्या चार मित्रांसोबत खदानीवर फिरण्यासाठी गेला होता. याठिकाणी तो मित्रांसोबत इन्स्टाग्रामवर रील्स शूट करत होता. त्याचवेळी रील शूट करण्यासाठी त्याने खदानीत उडी मारली पण तो परत बाहेर आलाच नाही. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर दिनेशच्या मित्रांनी नेमकं काय घडलं हे सांगितलं. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला. दिनेशचा एक मित्र पाय घसरून खदानीत पडला होता पण तो कसा तरी सुरक्षित बाहेर आला. त्यानंतर दिनेशने रील्स बनवण्यासाठी १५० फूटांवरून खदानीत उडी मारली. पण तो बराच वेळ पाण्यातून बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचे मित्र चिंतेत आले आणि त्यांनी याबाबत गोवर्धन पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सिव्हिल डिफेन्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तीन तासांच्या शोधकार्यानंतर तरुणाचा मृतदेह खदानीतून बाहेर काढला.

आशिया खंडातील सर्वात मोठे संगमरवरी बाजार उदयपूर आणि राजसमंद येथे आहे. येथे अनेक ठिकाणी खाणकाम केले जाते आणि संगमरवरीसह अनेक उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात. खाणकामामुळे येथे अनेक फूट खोल खड्डे तयार झाले असून ते पाण्याने भरले आहेत. ज्या खदानीत बुडून या तरुणाचा अपघात झाला तीही अशाच प्रकारची होती. सिव्हिल डिफेन्सचे वरिष्ठ स्वयंसेवक कैलाश मेनारिया यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान मृत तरुणाचे मित्र म्हणाले की, रील बनवताना त्याचा पाय घसरला आणि ते उडी मारण्याचेही बोलत होते. सध्या पोलिसांनी याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

SCROLL FOR NEXT