Rajasthan News Saamtv
देश विदेश

Rajasthan News: मन सुन्न करणारी घटना! बोअरवेलमध्ये पडून दोन भावांचा मृत्यू; कारवाईच्या भितीने शेतमालकाने स्वतःलाही संपवलं

Rajasthan Alwar News: शेतातील गुळगुळीत मातीमुळे मुलांचे दोन्ही पाय घसरून ते बोअरिंग खड्ड्यात पडले. ज्यामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला...

Gangappa Pujari

Rajasthan News: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भदिरा गावात शेतात बनवलेल्या खड्ड्यात बुडून एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला. शेतात बोअरिंगसाठी हा खड्डा खणला होता. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर शेत मालकानेही कारवाईच्या भितीने आपले आयुष्य संपवले. या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, कठुमार पोलीस स्टेशन हद्दीतील छोटा भदिरा गावात १९ जुलै रोजी ही दुर्देवी घटना घडली. बोअरिंगसाठी शेतात खड्डा खोदण्यात आला होता. बुधवारी दोन मुले त्यात पडली ज्यामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी करून कुटुंबीयांची तक्रार नोंदवली.

या घटनेने गावावर शोककळा पसरली. या संपूर्ण प्रकारानंतर शेतमालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला. ज्यामुळे पोलीस आणि इतर कारवाईच्या भीतीने कंटाळून साहेब सिंह यानेही गुरुवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान, राजेंद्र जाटव यांचा ९ वर्षांचा मुलगा लवकुश जाटव आणि या कुटुंबातील सत्येंद्र जाटव यांचा ६ वर्षांचा मुलगा गोलू उर्फ ​​यशांक जाटव अशी या मृत मुलांची नावे आहेत. दोघेही बुधवारी साहेबसिंग जाटव यांच्या शेतात बोरिंगसाठी केलेल्या खड्ड्यावर खेळू लागली. खड्डा पावसाच्या पाण्याने भरला होता.

शेतातील गुळगुळीत मातीमुळे त्यांचे दोन्ही पाय घसरून ते बोअरिंग खड्ड्यात पडले. बराच वेळ होऊनही मुले घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान दोघांचे मृतदेह खड्ड्यात पडलेले आढळून आले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

SCROLL FOR NEXT