Rajasthan Politics:
Rajasthan Politics: Saamtv
देश विदेश

Rajasthan News: तो पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांनीच दिला... फोन टॅपिंग प्रकरणात अशोक गेहलोत यांच्या माजी OSDचा गंभीर आरोप

Pramod Subhash Jagtap

राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मला केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत आणि इतरांचे फोन रेकॉर्डिंग दिले होते, असा खळबळजनक दावा अशोक गेहलोत यांचे ओएसडी राहिलेल्या लोकेश शर्मा यांनी केले आहेत. लोकेश शर्मा यांच्या या गंभीर आरोपांमुळे राजस्थानच्या राजकारणात नवा वाद उभा राहिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माजी ओएसडी लोकेश शर्मा यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्या प्रकरणावर बोलताना सर्वात खळबळजनक खुलासा केला आहे. जे कॉल रेकॉर्डिंग समोर आले, ते मुख्यमंत्र्यांनीच दिले होते, असा मोठा दावा लोकेश शर्मा यांनी केला आहे.

मी हॉटेलमधून बाहेर पडलो आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलो. जिथे सीएम अशोक गेहलोत माझी वाट पाहत होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना पेनड्राइव्ह देताना या पेनड्राइव्हचे ऑडिओ रेकॉर्डिंग मीडियामध्ये प्रसारित करावे, असे सांगितले. तेथून लोकेशने पेन ड्राइव्ह घेतला, लॅपटॉपमध्ये पेनड्राइव्ह टाकला, रेकॉर्डिंग काढले आणि प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवले, असा गौप्यस्फोट लोकेश शर्मा यांनी केला आहे.

दरम्यान, राजस्थानमधील काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस स्वर्णिम चतुर्वेदी यांनी याबाबत बोलताना लोकेश शर्मा हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर ते अशी विधाने करत आहेत. यात काही अर्थ नाही, असा आरोप करत लोकेश शर्मा यांचा आरोप फेटाळून लावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

Tharla Tar Mag: सुभेदार कुटुंबिय साजरा करणार सायली-अर्जुनचा लग्नाचा पहिला वाढदिवस; मालिकेचा नवीन प्रोमो आऊट

Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

Delhi Politics: निवडणुकीपूर्वी दिल्लीत मोठी घडामोड; राघव चढ्ढा लंडनहून परताच घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चा गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT