Rajasthan Couple ride in helicopter
Rajasthan Couple ride in helicopter saam tv
देश विदेश

पुत्र व्हावा ऐसा! मुलाने मजूर बापाचं स्वप्नं केले पूर्ण; हेलिकॉप्टरने वधूला आणले घरी

साम टिव्ही ब्युरो

धौलपूर: राजस्थानमध्ये (Rajasthan) वधूला वेगवेगळ्या पद्धतीने सासरी आणण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. धौलपूरचा नवरामुलगा नववधूला आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने (Helicopter) तिच्या घरी पोहोचला. आपला मुलगा सुनेला हेलिकॉप्टरने घरी आणेल (wedding ceremony) हे कष्टकरी बापाचे स्वप्न होतं. मजुराच्या मुलाने वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टर बुक केले आणि सरमथुरा उपविभागातील मीनेश भगवान मंदिराजवळ हेलिपॅड तयार केले. गावात उतरलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती.

यावेळी अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि बसेड़ीचे आमदार खिलाड़ी लाल बैरवा  हेही हेलिकॉप्टरमधून आले होते. त्यांनी वधू-वरांना आशीर्वाद देऊन उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवरा महेंद्रसिंग मीना हा उमरेह गावचा रहिवासी असून, मध्य प्रदेशातील पन्ना येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. वऱ्हाडी वरातीसह कसौटीखेडा येथे पोहोचताच वराच्या स्वागतासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

वराने वधूला हेलिकॉप्टरने घरी आणले

महेंद्र सिंहने सांगितले की, त्याच्या वडिलांचे स्वप्न होते की मुलाची वरात हेलिकॉप्टरने वधूच्या घरी पोहोचावी. मजूर असलेल्या राधेलाल यांनी सांगितले की, आज त्यांचे स्वप्न त्यांच्या मुलामुळे पूर्ण झाले. राधेलाल यांच्याकडे सुमारे ६ हेक्टर जमीन आहे, राधेलाल यांना तीन मुली आणि दोन मुले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

SCROLL FOR NEXT