Sandeep Gawade
साधारण लाल, काळी, हिरव्या आणि बैंगणी रंगाची द्राक्षे आढळतात. या द्राक्षांचा ज्युस पिण्याचे एक नाही तर कितीतरी फायदे आहेत
द्राक्षांमध्ये कॅलरी आणि फॅटचं प्रमाण खूप कमी असतं आणि व्हिटॅमीन सी आणि के चं प्रमाण अधिक असतं. तसचं अॅन्टीऑक्सीडंट, फायबर आणि खनिजांचंही प्रमाण असतं.
द्राक्षांमध्ये फायबरची मात्रा अधिक असल्यामुळे अपचनाचे आजार कमी होतात
द्राक्षाचा ज्युस पिल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेत, त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता कमी होते.
डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी द्राक्षांचा ज्युस गुणकारी माणला जातो, यात असलेले अॅन्टीऑक्सीडंटमुळे इन्फेक्शनचा धोका कमी असतो
द्राक्षांमध्ये असलेल्या अॅन्टी इन्फेमेंटरी गुणांमुळे ह्रदयाचं आरोग्य चांगलं राहत