Kota Viral Video Saam Tv
देश विदेश

पोलिसांच्या व्हॅनवर चढून कपलचा धिंगाणा, एकमेकांना मिठ्या मारत शिवीगाळ अन्..., पाहा VIDEO

Kota Viral Video: राजस्थानच्या कोटामध्ये एका कपलने भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा केला. पोलिसांच्या गाडीवर चढून या कपलने भररस्त्यात धिंगाणा केला. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

राजस्थानच्या कोटामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण-तरुणी पोलिसांच्या गाडीवर चढून शिवीगाळ करू लागले. रस्त्याच्या मधोमध या कपलचा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. तरुण दारूच्या नशेत होता आणि या दोघांनी भररस्त्यात गोंधळ घातल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या कपलच्या हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

शुक्रवारी रात्री रामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाजी मार्केटमध्ये ही घटना घडली. तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, आरोपी तरुण अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन जात होता. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी रात्री सरोवर टॉकीजजवळ गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या टीमला हे तरुण आणि तरुणी दिसले. पोलिसांना पाहून ते पळू लागले तर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडले. पण पोलिसांच्या गाडीमध्ये बसण्याऐवजी हे दोघे गाडीवर चढले आणि जवळपास १० मिनिटं त्यांनी भररस्त्यात राडा केला.

पोलिसांच्या गाडीवर चढून राडा करत असताना तरुणी त्याला जाऊ द्या असे ओरडत राहिली. तर तरुण शिवीगाळ करू लागला. तो तरुणीला मिठी मारून मारून पोलिसांकडे पाहत शिवीगाळ करत राहिला. पण त्याचवेळी दोघांचा तोल जातो आणि ते खाली पडतात. या दोघांमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले होते. घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती आणि सर्वजण मोबाइलमध्ये दोघांचा व्हिडीओ बनवत होते.

पोलिसांनी सांगितले की, तरुण-तरुणीची ओळख पटली आहे. २२ तरुण १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन जात होता. दोघांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी तरुणाविरोधात पोलिसांच्या वाहनावर चढून राडा केल्या प्रकरणी आणि अभद्र भाषाचा प्रयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chameleon: सरडा एका दिवसात किती वेळा रंग बदलतो?

Today Horoscope : नोकरीत प्रमोशन अन् व्यवसायात मिळणार यश; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Maharashtra Live News Update: यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही टीडब्ल्यूजेच्या चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Face Care Tips: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी सकाळी उठल्यावर चेहरा या घरातील सामग्रीने करा स्वच्छ, आठवड्याभरात दिसेल फरक

Cricket Shocking : क्रिकेट विश्वाला मोठा धक्का; टीम इंडियाच्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT