Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, विरोधक आज आयोगाला भेट देणार, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी; देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर!

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष श्री.नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील तसेच बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.

तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात थांबणे बंधनकारक

ग्रामीण भागातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

यापुढे राज्यातील सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अहिल्यानगर महानगर पालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही...

13 ऑटोबर होती प्रभाग रचना जाहीर होण्याची अंतिम तारीख...

प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर हरकती आणि सूचना जिल्हा अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याकडे लागले होते आजी माजी भावी नगरसेवकांचे लक्ष...

निवडणूक आयोगाने मुदत संपूनही अंतिम प्रभाग रचना जाहीर न केल्याने चर्चेचा विषय...

महापालिकेचे आयुक्त, उप आयुक्त,आणि इतर अधिकारी मुंबईत मात्र प्रभाग रचना जाहीर का करण्यात आली या बाबत प्रश्नचिन्ह

अमरावतीत उपोषणाच्या आंदोलनातील महिलेचा मृत्यू.

अनुकंपा नोकरी देण्यात यावी, त्यांच्या आईचे घर पूर्वीप्रमाणे त्यांनाच देण्यात यावे, मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हान, क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवामुक्त करण्यात यावे यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शांताबाई उकर्डा आणि त्यांची मुलगी विजया उकर्डा यांचे उपोषण चालू होते, मात्र 75 वर्षीय शांताबाई उकर्डा या महिलेचा  उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली

जालन्यात कहीं खुशी, कहीं गम जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेकांचा हिरमोड..

जालना जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणाची आरक्षण सोडत जाहीर झालीय. आरक्षण सोडतीमध्ये अनेक भावी उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.जालना जिल्हा परिषदेवर महिलाराज येणार असून एकूण 29 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. जालना जिल्हा परिषदेसाठी ओबीसी 15, एससी 8, एसटी 1 तर सर्वसाधारणसाठी 33 जागा निश्चित करण्यात आल्या आहे. तर जालना जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 114 गणांची आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आली आहे.

दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमती करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते..मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगारांना देण्यात आलं होतं. मात्र सिडकोच्या घराच्या किमती करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे..

धाराशिव जिल्ह्यातील 204 प्रकल्प ओव्हरफ्लो,93 टक्के उपयुक्त साठा

धाराशिव जिल्ह्यात यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला चार महिने झालेला पावसामुळे खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले तर दुसरीकडे प्रकल्प मात्र तुडुंब भरले आहेत. मागील 27 वर्षात पहिल्यांदाच जिल्ह्यातील 204 प्रकल्प डबडबून गेले आहेत.प्रकल्पात 93% उपयुक्त पाणीसाठा असल्याने रब्बीचा पेराही यंदा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवाय जिल्ह्यातील 350 गावांना उन्हाळ्यात टंचाई देखील भासणार नाही.मे महिन्यात बहुतांश महसूल मंडळात अतिवृष्टी झाली त्यामुळे नदी -ओढे उन्हाळ्यातच प्रवाहित झाले होते.त्यानंतर जून व जुलै महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला मात्र ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात धुवाधार पाऊस पडत राहिला परिणामी नदी,ओढे पात्र सोडून वाहत होते.प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने प्रकल्पात पाणी वाढले.

महायुतीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेस नको म्‍हणणाऱ्या शिवसेनेची सामंजस्‍याची भूमिका

रायगड जिल्‍ह्यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेणार नाही, असं ठासून सांगणाऱ्या शिवसेनेने रायगड जिल्ह्यात आपला सूर बदलला आहे. जिल्‍हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूका महायुतीमधूनच लढायच्‍या अशी सामंजस्‍याची भूमिका त्‍यांनी घेतली आहे. मात्र त्‍याचवेळी जागावाटपाचा फॉर्म्‍युलाही त्‍यांनी समोर आणला आहे. आरक्षण जाहीर झाल्‍यानंतर पक्षाचे मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्‍या बैठकीत यावर चर्चा झाली. जिल्‍ह्यात शिवसेना भाजपचे प्रत्‍येकी तीन तर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ एक आमदार आहे. जिल्‍हा परीषदेच्‍या 59 जागांचे वाटप पक्षाच्‍या आमदाराच्‍या संख्‍येनुसार करायचे. असा शिवसेनेचा प्रस्‍ताव आहे. हा प्रस्‍ताव त्‍यांनी महायुती समोर मांडण्‍याचा निर्णय घेतलाय. आता शिवसेनेचा हा प्रस्‍ताव घटक पक्ष असलेला राष्‍ट्रवादी कॉंग्रेस मान्‍य करेल का, हा खरा प्रश्‍न आहे.

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, १४ टक्के बोनस

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त यंदा कर्मचाऱ्यांना १४ टक्के बोनस केला जाहीर

गेल्या दोन दशकांतील हा सर्वोच्च बोनस ठरला असून, यंदाची दिवाळी अधिक गोड करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

राज्य बॅंकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी हा निर्णय जाहीर केला

बँकेचा स्वनिधी आठ हजार चारशे कोटी रुपयांच्या वर गेल्याने आशिया खंडातील सर्वात सक्षम राज्य बँक म्हणून बँकेने नावलौकीक प्राप्त केला आहे

भरत गोगावले, आदिती तटकरे आणि महेंद्र दळवी एकाच व्यासपीठावर

मागील चार वर्षांपासून रखडलेला रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अखेर पार पडला. 60 हून अधिक प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे तसेच आमदार महेंद्र दळवी यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले.

YAVATMAL : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 31 गटांत महिलाराज

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 62 गटांच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवनात काढण्यात आली यात काही प्रस्थापितांना धक्का बसला असून काहींना मात्र लॉटरी लागली आहे.सदर आरक्षण हे प्रारूप असल्याने 14 ते 17 ऑक्टोबर पर्यंत विभागीय आयुक्ताकडे आक्षेप दाखल करता येणार आहे. अनुसूचित जाती सात, अनुसूचित जमाती 14 नामाप्र 16 आणि सर्वसाधारण साठी 25 जागा सोडवण्यात आल्या आहेत.

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

आज मंगळवारी दुपारी 12.30 वाजता सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. लोकशाही बळकट व्हावी आणि निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी शिष्टमंडळ आयोगासोबत चर्चा करणार आहे.

कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही, सर्व योजना आम्ही चालवणार आहोत.  नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे, मात्र तरीही आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र

nashik malegaon-एटीएस कारवाई,संशयित व्यक्ती ताब्यात

नाशिकच्या मालेगाव मध्ये एटीएस व तेलंगणा पोलिसांनी संयुक्त पणे कारवाई करत तोशिफ शेख या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे तोशिफ हा सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातील काही संघटना व संशयित व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा गंभीर संशय असून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून,सुरक्षा यंत्रणेकडून याप्रकरणी गोपनीयतेने तपास करण्यात येत असून त्याच्या मोबाईल मधील डेटा,सोशल मीडिया अकाउंट तपासला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,या प्रकरणात पोलिसांकडून पूर्ण माहिती नसली तरी या घटनेमुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली आहे.

निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी मोठी अपडेट

घायवळ च्या पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांची होणार चौकशी

पासपोर्ट व्हेरिफिकेशन रिपोर्ट वर "not available" असा शेरा दिल्याप्रकरणी होणार चौकशी

घायवळ ने दिलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची शहानिशा का केली नाही असा प्रश्न अहिल्यानगर पोलिसांना विचारला जाण्याची शक्यता

अहिल्यानगर पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com