Rajasthan Shocking News: Saamtv
देश विदेश

Rajasthan News: OMG! एक, दोन नव्हे, पोटातून निघाले तब्बल ६००० खडे; कर्मचारी मोजून थकले, ऑपरेशन करताना डॉक्टरांना घाम फुटला

Gangappa Pujari

राजस्थान, ता. ९ सप्टेंबर

6110 Stones In Stomach Rajasthan News: राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात एका वृद्ध व्यक्तीच्या पोटातून तब्बल ६००० खडे निघाल्याने खळबळ उडाली आहे. पोटदुखीने त्रस्त असलेली ही व्यक्ती डॉक्टरांकडे गेली होती, यावेळी ऑपरेशन करताना हा प्रकार समोर आला. वृद्धाच्या पोटातून इतके खडे निघाले की रुग्णालयातील कर्मचारी मोजून मोजून थकले अन् ही शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनाही घाम फुटला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर....

बापरे! पोटात आढळले ६००० खडे

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील तलवंडी परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली असून 70 वर्षीय वृद्धाच्या पोटातून 6000 हून अधिक खडे बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. या खड्यांचा आकार मोहरीच्या दाण्यापासून ते हरभऱ्याएवढा होता. त्यांची मोजणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडीच तासांहून अधिक वेळ लागला. या वृद्धाला बऱ्याच दिवसांपासून पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली असता पित्ताशय मूळ आकाराच्या दीडपट वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.

डॉक्टरांनी सांगितलं कारण...

याबाबत लवंडी परिसरात खासगी रुग्णालय चालवणारे, डॉक्टर जिंदाल यांनी सांगितले की, संबंधित रुग्ण अनेक दिवस त्रस्त होते. सोनोग्राफीमध्ये त्यांच्या पित्ताशयाचा आकार 12 बाय 4 सेमी असल्याचे आढळून आले होते, जे 7 सेमी इतके असायला आहे. यानंतर रुग्णाला काल शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात आले. ऑपरेशनपूर्वी त्याला भूल देण्यात आली. त्यानंतर दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करून सुमारे 1 तासात 6110 हून अधिक खडे काढण्यात आले. हे सर्व खडे एका पाकिटात ठेवून कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्यांची मोजणी करण्यासाठी सुमारे अडीच तास लागले.

डॉक्टर जिंदाल म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी असाच आणखी एक रुग्ण आला होता, त्याचे वय 45 वर्षे होते आणि त्याच्या पित्ताशयातून सुमारे 5000 दगड बाहेर आले होते. डॉक्टरांनी सांगितले की, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये गडबड, व्यायामाचा अभाव आणि इतर अनेक कारणांमुळे पित्ताशयात खडे तयार होतात. ज्यामुळे खूप त्रास होतो. मात्र आता वृद्ध व्यक्ती पूर्णपणे निरोगी असून त्यांना पित्तदुखीचा त्रास कधीच होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT