Rajasthan News : एका सरकारी अभियंत्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मोठं घबाड मिळाले आहे. राजस्थानमधील PWD मध्ये काम करणाऱ्या दीपक कुमार मित्तल या अभियंत्याच्या सहा ठिकाणी एसीबीने छापेमारी केली. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे छापेमारीनंतर स्पष्ट झाले. एसीबीने मित्तल याच्याकडील १७ फ्लॅट, ५० लाख रूपयांची रोकड,१८ बँक खाती जप्त केली आहेत. आत ३ लॉकरची तपासणी केली जाणार आहे. मित्तल याची संपत्ती पाहून एसीबीच्या अधिकऱ्यांचे डोळे विस्फारले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दीपक कुमार मित्तल मोठ्या प्रमाणात लाच घेत असल्याची माहिती मिळाली. एसीबीने मित्तल याच्यावर पाळत ठेवली अन् सर्व माहिती जमा केली. त्यानंतर दीपक कुमार याच्याकडे ५० लाख रूपयांची रोकड आहे, दोन दिवसांत तो जमीन घेण्यासाठी गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती एसीबीला मिळाली. तात्काळ एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीपक कुमार मित्तल यांच्या घरी छापेमारी केली. एसीबीने अभियंत्याच्या सहा ठिकाणीच्या संपत्तीवर छापेमारी केली.
दीपक कुमार मित्तल याच्याकडे पाच कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे एसीबीच्या तपासात समोर आलेय. दीपक कुमार याची सर्व संपत्ती आणि बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. दीपक कुमार याच्याकडे तीन बँक लॉकर्स असल्याचेही समजलेय, आज एसीबी लॉकरची झडती घेणार आहे. दीपक कुमार कुटुंबियांच्या नावाने बेनामी संपत्ती खरेदी करतो. आशामध्ये त्याच्या कुटुंबियांच्या संपत्तीची माहितीही एसीबीने घेतली आहे. दरम्यान, आरोपी दीपक मित्तल याचा मुलगा उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एबबीबीएसचे शिक्षण घेतोय, तर मुलगी राजस्थानमधील चूरू येथून एमडी करत आहे.
आरोपी दीपक मित्तल ज्या ज्या शहरात नोकरीच्या निमित्ताने राहिलाय, त्या ठिकाणी त्याने संपत्ती खरेदी केली आहे. जयपूरमध्ये एक कोटींपेक्षा जास्त किंमतीचे चार फ्लॉट आहेत. उदयपूरमध्ये १.५० कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीचे दहा प्लॉट आहे. ब्यावर आणि अजमेर येथेही लाखो रूपयांचे प्लॉट आहेत.
जयपूर येथील बरकत नगरमधील दीपकच्या घरात ५० लाख रूपयांची रोकड, अर्धा किलो सोनं, दीड किलो चांदी एसीबीने जप्त केली. दीपककडे १८ बँक खाती आहेत, त्या खात्यात लाखो रूपये जमा आहेत. एसआयपीमध्ये त्याने ५० लाख रूपयांची गुंतवणूक केली. पोलिसांनी दीपक याची सर्व संपत्ती जप्त केली असून चौकशी सुरू केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.