Rajasthan Exit Polls 2023 Saam Tv
देश विदेश

Rajasthan Exit Polls 2023 : राजस्थानमध्ये परंपरा मोडणार की भाजप येणार सत्तेत? एक्झिट पोलमध्ये कोणाला किती जागा? जाणून घ्या

Satish Kengar

Rajasthan Exit Polls 2023 :

राजस्थानमध्ये कोणाचे सरकार येणार सत्ते हे 3 डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल, परंतु एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून निश्चितपणे काही संकेत मिळू शकतात. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी 199 जागांसाठी मतदान झाले होते. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने तीन दशकांची जुनी परंपरा मोडीत काढत सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापनेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. तर दुसरीकडे भाजपने यावेळी जनतेचा आपल्यावर विश्वास असून आपणच सत्तेत येणार, असा दावा केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजस्थानमध्ये जवळपास 75 टक्के मतदान झाले. पोखरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 86.79 टक्के मतदान झाले. तिजारा 85.15 टक्के मतदानासह दुसऱ्या स्थानावर आहेत. मारवाड जंक्शन विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 61.10 टक्के मतदान झाले होते. यातच एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा येऊ शकता, भाजप की काँग्रेस? कोण सत्ता स्थापन करू शकतो, याची आकडेवारीच्या माध्यमातून शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यातच एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा येऊ शकता, भाजप की काँग्रेस? कोण सत्ता स्थापन करू शकतो, याची आकडेवारीच्या माध्यमातून शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातच राजस्थानमध्ये गेल्या तीन दशकांपासून दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. एकदा भाजपने आणि एकदा काँग्रेसने येथे सरकार स्थापन केले आहे. (Latest Marathi News)

भाजपला बंपर बहुमत मिळेल, टाईम्स नाऊचा अंदाज

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुत मिळत असल्याचं अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात भाजपला 108-128 , काँग्रेसला 56-72 आणि इतर पक्षांना 13-21 जागा मिळताना दिसत आहे.

न्यूज 18 एक्झिट पोल

न्यूज 18 च्या एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपला 111 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काँग्रेसला 74 तर इतरांना 14 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पोलस्टार्ट एक्झिट पोल

पोलस्टार्टच्या एक्झिट पोलमध्येही भाजपला राजस्थानमध्ये आघाडी मिळाल्याचे दिसून आले आहे. भाजपला 100 ते 110 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळतील, असे सांगितले जात आहे.

'जन की बात' एक्झिट पोलमध्ये भाजपसाठी आनंदाची बातमी

'जन की बात' एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपला 100-122 जागा मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 62 ते 85 जागा मिळू शकते, असं सांगण्यात आलं आहे. तसेच इतरांना 14-15 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT