Sharad Pawar : 'शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची ईच्छा होती, पण..' काय म्हणाले प्रफुल्ल पटेल

Praful Patel On Sharad Pawar: शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची ईच्छा होती, असं अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
Praful Patel On Sharad Pawar:
Praful Patel On Sharad Pawar: Saam Tv
Published On

>> रुपाली बडवे

Praful Patel On Sharad Pawar:

शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची ईच्छा होती, असं अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''पी.व्ही. नरसिंह राव यांना हटवण्यासाठी आम्ही पुर्णपणे प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरी यांना काँग्रेसचं अध्यक्ष केलं. सहा महिने पूर्ण होतं नाहीत, तोच केसरी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. 145 पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले सर्वणी विनंती केली तुम्ही केसरी यांना हटवा.''

ते पुढे म्हणाले की, ''त्यावेळी मला देवेगौडा यांचा फोन आला. मी देवेगौडा यांच्या घरी गेलो, ते म्हणाले मी राजीनामा देतो. फक्त केसरीला हटवा आणि शरद पवार यांनी भूमीका घ्यावी (पंतप्रधानपदाची).'' माध्यमांशी बोलताना ते असंम्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Praful Patel On Sharad Pawar:
CM Eknath Shinde News: कोकणी माणसाने बाळासाहेबांवर, शिवसेनेवर प्रेम केलं...त्यांना काय मिळालं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ''मी शरद पवार यांना जाऊन सांगितलं. आपल्याला मोठी संधी आहे, परंतु 15 मिनिटांत त्यांनी बैठक संपवली आणि नंतर बोलू असं म्हणत सुवर्णसंधी गमावली. काय झालं मलाही कळलं नाही. त्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, ही खंत माझ्या मनात आहे.''  (Latest Marathi News)

पटेल म्हणाले, ''आपल्या बाबत सध्या चुकीची माहिती पसरवली जातेय. परंतु मी, अजित पवार हे थेट जाऊन पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना जाऊन भेटलो. त्यावेळी त्यानी स्पष्ट सांगितलं की, आमची एक विचारधारा आहे. आम्ही त्यात तडजोड करु शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्याला याला परवानगी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही.''

Praful Patel On Sharad Pawar:
What is Exit Poll : एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? नियम, फायदे-तोटे सविस्तर जाणून घ्या

'दादा एके दादा'

अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, अजित पवार यांना हे भेकड म्हणतात त्यांना सांगतो राज्यांत जो कोणी मर्द असेल तर ते एकमेव अजित पवार आहेत. पटेल म्हणाले, ''माझे अजित पवार यांचे चांगले आणि गोड संबंध होते. मात्र जवळ नव्हते, कारण मी शरद पवार यांच्या जवळ होतो. त्यामुळं अजित पवार यांच्यासोबत मी गेलो, त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं की ,अजित पवार यांच्यासोबत कसं काय? अनेकांना वाटलं यांचं आतून सख्य आहे. आपण अजित पवार यांच्या सोबत जाताना राजकिय भुमिका घेतली होती. आता आपण भूमीका घेतली आहे, दादा एके दादा. दादांसोबत जाण्याचा आता निर्णय घेतला आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com