Rajasthan Crime News  Saam TV
देश विदेश

Viral News : मटण खाण्यासाठी आला अन् सासूला घेऊन पळाला; जावयाचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले!

सासूरवाडीला आलेला जावई चक्क सासूला घेऊन पसार झाला आहे.

Satish Daud

Viral Marathi News : प्रेम हे आंधळं असतं म्हटलं जातं. प्रेमात जात, पात, धर्म बघितला जात नाही. कोण कधी कुणावर प्रेम करेल हे सांगता येत नाही. काहीजण प्रेमात अक्षरश: वेडे होतात आणि घरदार सोडून पळून जातात. असाच काहीसा प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे. सासूरवाडीला आलेला जावई चक्क सासूला घेऊन पसार झाला आहे. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जावयावर गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथील एका २७ वर्षीय तरुणाचे महिनाभरापूर्वी लग्न झाले होते.

आपल्या लाडक्या जावयाला जेवणाचं निमंत्रण द्यावं असं सासू-सासऱ्यांनी ठरवलं. ठरल्यानुसार, जावई घरी आला. त्याने सासऱ्यासोबत दारूची पार्टी केली. रात्री सगळ्यांनी मटणावर ताव मारला आणि झोपी गेले. दरम्यान, आपल्यावर कुणाचं लक्ष नसल्याचं बघत जावई हा सासूला घेऊन फरार झाला.

जेव्हा सासरा शुद्धीवर आला तेव्हा त्याला घरात जावई दिसला नाही, त्याने शोध घेतला असता, बायको सुद्धा घरात दिसून आली नाही. आपली लाडकी बायको लाडक्या जावयासोबत फरार झाल्यानंतर सासऱ्याला धक्काच बसला त्याने तातडीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

सासूचा जडला होता जावयावर जीव

मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय सासूचे लग्नाच्या आधीच २७ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबध होते. दोघांचाही एकमेकांवर जीव जडला होता. आपले नाते कायम टिकावे यासाठी सासूने एक प्लॅन आखला. तिने आपल्या मुलीचे लग्न या तरुणसोबत लावून दिले.

लग्नाच्या महिनाभरानंतर दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार सासरच्या मंडळींना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. आता पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये अराजक स्थिती, भारतीयांसाठी मोदी सरकारकडून एडवायजरी, वाचा नेमकं काय सांगितलं

Akshay Kumar Birthday: '१५० हून अधिक चित्रपट आणि...', वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमारची खास पोस्ट, मानले प्रेक्षकांचे आभार

Vice Presidential Election: आगे आगे देखो होता है क्या; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान|VIDEO

Nepal Banned Social Media : नेपाळ नंतर 'या' देशात सोशल मीडियावर बंदी, जाणून घ्या

Mumbai Traffic Police Viral Video: हा अधिकार कुणी दिला ? पोलिसांनी पार्किंगमधल्या धाडधाड गाड्या पाडल्या, व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

SCROLL FOR NEXT