RAJASTHAN HOTEL RAID EXPOSES SEX RACKET AND ILLEGAL LIQUOR TRADE Saam tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! हॉटेलच्या बंद खोलीत तरुणी आणि पुरुष नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच भयंकर सत्य आलं समोर

Rajsthan Crime News : राजस्थानातील मोर गावाजवळील हॉटेलवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात वेश्याव्यवसाय आणि अवैध दारू विक्री उघड झाली. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • मोर गावाजवळील हॉटेलवर पोलिसांचा छापा

  • वेश्याव्यवसाय आणि अवैध दारू विक्री उघड

  • सहा आरोपी अटकेत, तीन तरुणींची सुटका

  • बनावट ग्राहकाच्या मदतीने कारवाई यशस्वी

राजस्थानमधून मोठी बातमी समोर आली आहे. गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोर गावाजवळील महामार्गावरील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यादरम्यान काही तरुण मुली आक्षेपार्ह स्थितीमध्ये सापडल्या. या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय आणि अवैध दारू विक्री सुरु असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी तरुणींची सुटका केली असून हॉटेल मालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गढी पोलीस ठाणे आणि जिल्हा विशेष शाखेच्या (डीएसबी) संयुक्त पथकाने या हॉटेलवर छापा टाकला. छाप्यादरम्यान तीन महिला, तीन पुरुष आणि हॉटेल चालक गुलाब सिंग यांना अटक करण्यात आली. तसेच, हॉटेलमधून बिअरच्या १९ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चंद मीना यांनी सांगितले की, या हॉटेलमध्ये अश्लील कृत्ये सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना अनेक दिवसांपासून मिळत होत्या. मात्र, ठोस पुरावे मिळत नसल्यामुळे कारवाई करणे कठीण जात होते. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला. यासाठी एका बनावट ग्राहकाला पैशांसह हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी त्या पैशांच्या नोटांचे क्रमांक आधीच नोंदवून ठेवले होते.

बनावट ग्राहकाने हॉटेल मालकाशी संपर्क साधून व्यवहार निश्चित केला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यादरम्यान हॉटेलच्या खोल्यांमध्ये तीन तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या. तसेच, तीन पुरुषांनाही घटनास्थळीच अटक करण्यात आली. उपअधीक्षक महेंद्र कुमार यांनी सांगितले की, हॉटेल चालक आणि काही दलाल मिळून तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलण्याचे काम करत होते. या प्रकरणात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असून पोलिसांकडून त्याचा सखोल तपास सुरू आहे. हॉटेलच्या व्यवहारांची आणि नोंदींचीही तपासणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ! कोट्यवधींचा मनी लॉन्डरिंग घोटाळा उघड , ईडीचे ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

ST Bus Fare : गावखेड्यातील लोकांना मोठा झटका! लालपरीच्या भाड्यात मोठी वाढ; पण 'या' प्रवाशांना मात्र मोठा दिलासा

Maharashtra News Live Update: पुणे मनपा उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून सहा लाखांचा गंडा

पावसाळ्यात प्या हेल्दी कॉर्न सूप; चवीसह आरोग्यासाठी फायदेशीर

Pune Fort : लोणावळ्याजवळील ३०० वर्षे जुना किल्ला, 'हे' ठिकाण इतिहासप्रेमींनी एकदा तरी पाहाच

SCROLL FOR NEXT