Rajasthan Accident News 
देश विदेश

Rajasthan Accident: माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील एका कारला अपघात, ६ पोलीस जखमी

Rajasthan Accident News: राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झालाय. या कारमध्ये पोलीस कर्मचारी होते. दरम्यान अपघात झाल्यानंतर वसुंधरा यांनी तात्काळ आपल्या कारमधून उतरून जखमींना रुग्णालयात नेले.

Bharat Jadhav

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झालाय. वसुंधरा या पाली जिल्ह्यातील बाली तालुक्यातील मुंदरा येथे गेल्या होत्या आणि तेथून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात सहा पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताची याची माहिती वसुंधरा राजे यांना समजताच त्यांनी लागलीच सर्वांना रुग्णालयात पाठवले तसेच स्थानिक आमदारांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली.

प्राथमिक उपचारानंतर पोलिसांना घरी सोडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे त्यांच्या ताफ्यासह पाली जिल्ह्यातील बाली तहसीलच्या मुंदरा गावात गेल्या होत्या. त्या मंत्री ओतराम देवासी यांच्या घरी गेल्या होत्या. ओतराम देवासी यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे सांत्वन करण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी वसुंधरा रविवारी त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या.

मंत्री ओताराम यांच्या घरातून त्या परतत असताना वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील एका कारला अचानक अपघात झाला. अपघातग्रस्त झालेली कार ताफ्यासह जात होती. त्यावेळी या कारला अपघात झाला. वसुंधरा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्या कारमध्ये बसले होते. जीप उलटल्यानंतर काफिला थांबला आणि वसुंधरा यांना याची माहिती देण्यात आली.

काही दिवसापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांच्या ताफ्याचा देखील अपघात झाला होता. काही दिवसापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांच्या ताफ्याचा देखील अपघात झाला होता. ताफ्यातील एक वाहन उलटल्याने हा अपघात झाला होता. यात 5 पोलिसांसह 7 जण जखमी झाले होते. सीएम भजनलाल शर्मा यांनी स्वतः सर्व जखमींना रूग्णालयात दाखल केलं होतं.

राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड हे जयपूरमधील श्री सोहन सिंग मेमोरियल स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन कार्यक्रमासाठी जाणार होते. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे देखील उपराष्ट्रपतींच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार होते. मात्र त्याआधीच त्यांच्या ताफ्याच्या गाडीला अपघात झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT