ED, Rajasthan News Saam Digital
देश विदेश

ED, Rajasthan News: ED अधिकाऱ्यावरच ACB ची धाड; ताब्यातही घेतलं, नेमका कोणत्या प्रकरणात अडकला?

ED, Rajasthan News: राजस्थान एसीबीने ईडीच्या अधिकाऱ्यावरच कारवाई केली आहे. त्या अधिकाऱ्यावर मध्यस्थी करण्यासाठी १५ लाखाची लाच मागितल्याचा आरोप आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ED, Rajasthan News

राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली होती. तसेच मुख्यमंत्री गहलोत यांचे चिरंजिव वैभव गहलोत यांचीही चौकशी करण्यात आली होती. मात्र, आता राजस्थान एसीबीने ईडीच्या अधिकाऱ्यावरच कारवाई केली आहे. त्या अधिकाऱ्यावर मध्यस्थी करण्यासाठी १५ लाखाची लाच मागितल्याचा आरोप आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी नवल किशोर मीना यांनी एका प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर राजस्थान सरकारच्या तपास संस्थेने या केंद्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या ईडीच्या अधिकाऱ्याने बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा एसीबीला संशय होता. त्यावरून एसीबीने संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आणि अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणावर एसीबी लवकरच अधिकृतरित्या घोषणा करणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजस्थानमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे निवडणूक काळातच ईडीने काँग्रेसच्या नेत्यांवर धाड टाकल्यामुळे केंद्र सरकार सरकारी संस्थांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप गहलोत यांनी केला होता. काँग्रेसने गरीब, महिला आणि शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

SCROLL FOR NEXT