Raja Raghuvanshi Case update  Saam tv
देश विदेश

Raja Raghuvanshi Case : जिथे हत्या केली, तिथेच हिशोब होणार; मध्यरात्री सोनमला शिलाँगला नेणार, नेमकं काय घडणार?

Raja Raghuvanshi Case update : राजा सुर्यवंशी प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आरोपी सोनमला मध्यरात्री शिलाँगला नेलं जाणार आहे.

Vishal Gangurde

सोनम रघुवंशीने मेघालयाच्या शिलाँगमध्ये पती राजा रघुवंशीची हत्या केली. त्याच ठिकाणी पोलिसांनी सोनमला नेण्याची तयारी सुरु केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनमला मध्यरात्री शिलाँगला नेलं जाणार आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरण मेघालय पोलिसांकडून हाताळलं जात आहे. तर इंदूरच्या पोलिसांकडून सहकार्य केलं जात आहे. मेघालय कोर्टात संपूर्ण प्रकरण चालवण्यात येणार आहे.

राजा रघुवंशीची बायको सोनम ही मेघालयातील शिलाँगमध्ये नेलं जाणार आहे. मेघालय पोलिसांना सोनम रघुवंशीचा तीन दिवसांचा ट्रांजिट रिमांड मिळाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेघालय पोलीस सोनमला तिथेच घेऊन जाणार आहेत. या व्यतिरिक्त राजा रघुवंशीची आई उमा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, मी सोनमला विचारणार की, त्यादिवशी राजासोबत काय झालं? त्यानंतर उमा यांनी पुन्हा दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली.

सोनमने राजाची हत्या केली, यावर रघुवंशी कुटुंब विश्वास करत नव्हतं. मात्र, हळूहळू या प्रकरणाचे धागेदोरे उलगडत गेले. काही दिवसांनी राजा रघुवंशीची हत्या सून सोनम रघुवंशीने केल्याचे पोलीस तपासात उघड झालं. पती राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम इंदूरमध्ये दिसली होती. सोनम तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिथे आली होती.

राजा आणि सोनम हनीमूनसाठी २० मे रोजी मेघायलला गेले होते. त्यांच्याजवळ रिटर्न तिकीट नव्हतं. त्यांनी रिटर्न तिकीट काढलं नव्हतं. दुसरीकडे या दोघांचा पाठलाग ३ आरोपी करत होते. आरोपी बॉयफ्रेंड राजने त्यांना आधी गुवाहाटीला पाठवलं. तिथेच त्यांनी कुऱ्हाड खरेदी केली. त्यानंतर ते शिलाँगला पोहोचले. आरोपी त्यांच्या हॉटेलजवळच थांबले होते. सोनमच्या साथीने तिघांनी राजा रघुवंशीची हत्या केली. त्यानंतर राजाचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला.

दरम्यान, राजा रघुवंशीच्या आईने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांच्या तपासात आणखी खुलासा होणार आहे. त्यात पोलीस मध्यरात्री सोनमला शिलाँगला घेऊन जाणार आहेत. या प्रकरणाची आणखी माहिती हाती येणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

SCROLL FOR NEXT