Raja Raghuvanshi Case Saam Tv
देश विदेश

Raja Raghuvanshi: राजा रघुवंशीला क्रूरपणे मारत होते; सोनम निर्दयीपणे बघत होती, भयानक हत्याकांडाला धक्कादायक वळण

Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण आले आहे. राजाची हत्या त्याची बायको सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने केली. या दोघांनी हत्येचा कट रचत ३ शूटर्सला सुपारी दिली. राजाची हत्या होताना सोनम तिथेच उपस्थित होती.

Priya More

इंदूरमधील राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. राजाची हत्या त्याची बायको सोनमनेच केली हे जेव्हा समोर आलं तेव्हा सर्वांना हादरला बसला. सोनमनेच आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने या हत्येचा कट रचला होता. यासाठी तिने ३ शूटर्सला सुपारी दिली होती. महत्वाचे म्हणजे सोनमने राजाला न सांगता हनिमूनसाठी शिलाँगचे तिकीट बुक केले होते. त्याठिकाणी नेऊन राजाची हत्या करण्यात आली. राजाची हत्या होत असताना सोनम तिथेच होती. आरोपी कुऱ्हाडीने राजावर वार करत राहिले आणि सोनम ते पाहत राहिली.

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात सोनमसह ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने फक्त राजाची हत्या केल्याची कबुली दिली नाही. तर राजाची पत्नी सोनम रघुवंशी घटनास्थळी उपस्थित होती आणि तिच्या नवऱ्याचा मृत्यू होताना ती पाहत होती.

राजा रघुवंशीवर पहिला हल्ला विशाल उर्फ ​​विकी ठाकूरने केला. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, राजा रघुवंशीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि नंतर त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला. हत्याचे संपूर्ण थरार आरोपींनी पोलिसांना सांगितला. गुन्हे शाखेच्या तपासानुसार, विशाल, आकाश आणि आनंद हे तिघे आरोपी इंदूरहून ट्रेनने गेले. त्यांनी मेघालयला पोहोचण्यासाठी अनेक गाड्या बदलल्या. सर्वात आधी ते गुवाहाटी आणि नंतर शिलाँगला गेले.

सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा इंदूरमध्येच राहिला. परंतु त्याने तिन्ही शूटर्सला त्यांच्या प्रवासाच्या खर्चासाठी प्रत्येकी ४०,००० ते ५०,००० रुपये देऊन आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, राजा मारला गेला तेव्हा सोनम घटनास्थळी उपस्थित होती आणि ती सर्वकाही पाहत होती. दरम्यान, नवऱ्याच्या हत्येनंतर सोनमने ड्रग्ज घेतलं आणि अपहरणाचा कांगावा केला. ती त्याठिकाणावरून फरार झाली. या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक झाल्याचे कळाल्यानंतर सोनमने आत्मसमर्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT