rain warning in Madhya Maharashtra Uttar Pradesh Bihar jharkhand next 48 hours imd Alert  Saam TV
देश विदेश

Rain Alert: सावधान! पुढील ४८ तासांत अवकाळी पाऊस कोसळणार, 'या' राज्यांना झोडपून काढणार; IMD कडून अलर्ट

Weather Alert News: पुढील ४८ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

Weather Update, Rain Alert

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नोव्हेंबरमध्ये आलेल्या अवकाळीने खरीप हंमातील पिकांचं मोठं नुकसान केलं होतं.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. आता जानेवारी महिन्यात पुन्हा अवकाळीचं ढग दाटून आल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, करडी पिकांची नासधूस होण्याची शक्यता आहे.

खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि रायलसीमा येथे काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो.

मध्य प्रदेशचा काही भाग आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि पश्चिम हिमालयात हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ८ जानेवारी रोजी उत्तर मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. दुसरीकडे पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. ११ जानेवारीनंतर आकाश मोकळे होईल आणि अवकाळीचं संकट दूर होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET : राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार, वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्वाचे आदेश; ‘टीईटी’ संदर्भातील नवीन अपडेट काय?

Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता; राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

Malegaon Blast Case: NIA कोर्टचा आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांची अडचण वाढणार?

एका दिवसात किती सब्जा खावा? जाणून घ्या

Aloe Vera: कोरफडीचे जेल रात्रभर चेहऱ्यावर लावल्याने कोणते फायदे होतात?

SCROLL FOR NEXT