Weather Update 25 March 2024 Saam TV
देश विदेश

Weather Forecast: सावधान! पुढील ४८ तासांत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; IMD कडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

IMD Rain Alert: येत्या ४८ तासांत बिहार, झारखंड आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Satish Daud

Weather Update 25 March 2024

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही राज्यांमध्ये उन्हाच्या झळा, तर काही भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशातच येत्या २६ मार्च रोजी पश्चिम हिमाचल प्रदेशावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात जोरदार वारे वाहू शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिणामी हवामानात मोठा बदल होऊन येत्या ४८ तासांत बिहार, झारखंड आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (Breaking Marathi News)

त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजधानी दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम आणि पूर्व राजस्थानमध्ये देखील या काळात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये मंगळवारपासून हवामानाची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २८ मार्चला हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट (Rain Alert) देण्यात आलाय.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मात्र, आता राज्यातील उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे.

होळीनंतर राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई पुण्यासह ठाणे शहरात उन्हाचा कडाका वाढणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. अशातच उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT