Rahul Gandhi News Saamtv
देश विदेश

Rahul Gandhi News: कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी सोडला सरकारी बंगला; चावी देताना भावुक प्रतिक्रिया...

12 Tughlaq Lane Bungalow: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे जवळपास दोन दशकांपासून या घरात वास्तव्य होते.

Gangappa Pujari

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी (२१ एप्रिल) आपले शासकीय निवासस्थान १२ तुघलक लेन पूर्णपणे रिकामे केले आहे. खासदार म्हणून राहुल गांधी यांना 12, तुघलक लेन हा बंगला देण्यात आला होता. मोदी आडनाव प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने दोषी ठरवत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर खासदारकी रद्द झाल्याने राहुल गांधींना हा बंगला सोडावा लागला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांचे जवळपास दोन दशकांपासून या घरात वास्तव्य होते. मात्र खासदारकी गेल्यामुळे त्यांना घर रिकामं करण्याची नोटीस पाठवण्यात आली. यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. चार दिवसांपूर्वी राहुल यांनी बहुतांश सामान 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी पाठवले होते. काल संध्याकाळी त्यांनी शेवटचं शिफ्टींग केलं. ते स्वतः काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधींच्या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत.

राहुल गांधी सरकारी बंगला सोडण्याची नोटीसीला उत्तर देताना "मी या घरात 2004 सालापासून राहत आहे. त्यामुळे या घरासोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. परंतु तुम्ही मला घर खाली करण्याचे पत्र पाठवले आहे. मी वेळेतच घर खाली करणार आहे" अशी प्रतिक्रिया दिली होती.

सुरत न्यायालयाने ठरवले होते दोषी..

राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार (MP) होते. वायनाड येथील जाहीर सभेत त्यांनी एक वक्तव्य केले होते. पैसे घेऊन परदेशात जाणारे लोक हे मोदी आडनावाचे कसे? असे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप (BJP) आमदार पुर्णेश मोदी यांनी या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर सुनावणी करता सूरत (Surat) कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर– राज ठाकरे

HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेट नसल्यास होणार दंडात्मक कारवाई; वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

'हा तर शिंदे-फडणवीसांच्या विरोधातील गेम प्लॅन, दिल्लीतून हात असल्याचा संशय'; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

Vastu Tips : किचनच्या भिंतींसाठी कोणता रंग शुभ? जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार कोणता रंग योग्य? वाढेल सकारात्मक उर्जा

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; मुलुंड, ठाणे अन् कांजूरमार्ग परिसरात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मुंबईकरांचे हाल

SCROLL FOR NEXT