Nagpur Crime News: कहरच केला! दारु पिण्यासाठी तो बनला बाईकचोर, पोलिसांनी 'अशी' उतरवली नशा; जप्त केल्या तब्बल...

Nagpur Crime News: नागपूर शहरात वेगवेगळ्या भागात फिरून हा तरुण बाईक चोरी करत असल्याचे समोर आले आहे. .
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaamtv

Nagpur News: दारू पिण्याचा शौक कोणाला कुठं नेईल काही सांगता येत नाही. अनेकदा घरच्या वस्तू विक्री करून दारूसाठी पैसे खर्च केले जातात. तर कधी उसनवारी करुन दारुची तलफ भागवणारेही अनेकजण आहेत. मात्र एका तरुणाने दारु आणि गांजा पिण्यासाठी चक्क बाईक चोरी करण्यास सुरूवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Nagpur Crime News
PM Modi Threat: कोची दौऱ्याआधीच पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; केरळमध्ये हायअलर्ट जारी

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या (Nagpur) पाचपावली पोलिसांच्या हाती एक असा चोरटा लागला ज्याला दारू, गांजा पिण्याचा शोक होता. त्याला आपले शौक पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज पडायची. त्यामुळे ही गरज भागविण्यासाठी त्याने चक्क बाईक चोरीचा उद्योग सुरू केला. नागपूर शहरात वेगवेगळ्या भागात फिरून तो बाईक चोरी करायचा.

Nagpur Crime News
KDMC Viral VIdeo: पालिका कर्मचारी चक्क विकतायत कचरा, व्हिडीओ व्हायरल

मात्र एका चोरीच्या घटनेचा तपास पोलीस (Police) करत असताना त्यांच्या हाती हा आरोपी लागला आणि पोलिसांनी आपला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने पाच गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, या पाचही बाईक पोलिसांनी जप्त केल्या असून याने आणखी कुठे अशा प्रकारच्या घटना केल्या का? याचे कोणी साथीदार आहे का? याचा शोध घेत आहे. नशेची तलफ भागवण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग शोधणाऱ्या या चोराची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com