KDMC Viral VIdeo: पालिका कर्मचारी चक्क विकतायत कचरा, व्हिडीओ व्हायरल

Viral VIdeo: पालिका कर्मचारी चक्क विकतायत कचरा, व्हिडीओ व्हायरल
KDMC Viral VIdeo
KDMC Viral VIdeoSaam Tv

>> अभिजीत देशमुख

KDMC Viral VIdeo: कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी चक्क कचरा विकत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ते हा काचा विकून पैसे कमावत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

KDMC Viral VIdeo
Pm Narendra Modi : पंतप्रधान मोदी 36 तासांत 5 हजार किमीचा प्रवास करणार, 7 शहरांमध्ये 8 कार्यक्रमांना हजेरी लावणार

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छतेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ओला सुका कचरा वर्गीकरनासह अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सोसायटींकडून ओला सुका कचरा वर्गीकरण करत तो महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. (Viral VIdeo)

या कचऱ्याची महापालिकेकडून विल्हेवाट लावली जाते. दरम्यान, कचरा गाड्यावरील कामगार प्लास्टीकचा कचरा हा एका भंगारच्या दुकानात विकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.(Latest Marathi News)

KDMC Viral VIdeo
Amitabh Bachchan Viral Tweet : 'तू चीज बडी है Musk Musk..', अमिताभ बच्चन यांना ट्विटरवर 'ब्लू टिक' परत मिळालं

त्यामुळे महापालिका सुका कचरा प्रक्रियेसाठी पाठवित असल्याचे सांगत असली तरी या व्हिडीओमध्ये कर्मचारी कचरा विकून पैसा कमावित असल्याची बाब दिसून येत आहे. या प्रकरणी बसपाचे पदाधिकारी सुदाम गंगावणे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार करुन चौकशी करण्याच मागणी केली आहे.

याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com