Pm Narendra Modi : पंतप्रधान मोदी 36 तासांत 5 हजार किमीचा प्रवास करणार, 7 शहरांमध्ये 8 कार्यक्रमांना हजेरी लावणार

Pm Modi : पंतप्रधान मोदी 36 तासांत 5 हजार किमीचा प्रवास करणार
Pm Narendra Modi
Pm Narendra ModiSaam Tv

Pm Narendra Modi : पंतप्रधान मोदी 24 एप्रिलपासून सुरू होणार्‍या 36 तासांत देशाच्या विविध भागांत 5,000 किलोमीटरहून अधिकचा प्रवास करणार आहेत. हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. त्यादरम्यान ते आठ कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि सात वेगवेगळ्या शहरांना भेट देतील.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी दिल्लीपासून हा दौरा सुरु होणार. पंतप्रधान मोदी आधीमध्य मध्य प्रदेशमध्ये प्रवास करतील. (Latest Marathi News)

Pm Narendra Modi
Amitabh Bachchan Viral Tweet : 'तू चीज बडी है Musk Musk..', अमिताभ बच्चन यांना ट्विटरवर 'ब्लू टिक' परत मिळालं

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, त्यानंतर ते दक्षिणेकडील केरळला जाणार. पुढे पश्चिमेला केंद्रशासित प्रदेशात मुक्काम करणार आणि नंतर दिल्लीत परतणार.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, "पंतप्रधान 24 एप्रिलला सकाळी प्रवास सुरू करतील. ते दिल्ली ते खजुराहो असा प्रवास करतील, सुमारे 500 किमी अंतर कापतील. खजुराहोपासून ते रीवा प्रवास करतील. जेथे ते राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात सहभागी होतील.

Pm Narendra Modi
Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल

त्यानंतर सुमारे 280 किमीचा प्रवास करून ते खजुराहोला परत येतील. खजुराहो येथून ते कोची येथे जाणार. यावेळी ते सुमारे 1700 किमी अंतराचे हवाई प्रवास करून युवाम कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com