RAHUL GANDHI MAHARASHTRA VISIT: CONGRESS’ GEN Z STRATEGY IN NASHIK saam tv
देश विदेश

'जेन झी'सोबत राहुल गांधी शड्डू ठोकणार, राहुल गांधींचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा

Rahul Gandhi’s Maharashtra Visit: जेन झी सोबत राहुल गांधी आता सत्ताधाऱ्यांविरोधात शड्डू ठोकणार आहेत... येत्या 22 ऑगस्टला राहुल गांधी 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. तर जेन झीसोबत कनेक्ट करण्यासाठी काँग्रेसनं काय रणनीती आखलीय?..पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

राज्यात सध्या कोणतीही निवडणूक तोंडावर नसताना काँग्रेस पक्षानं आपली रणनीती पूर्णपणे बदललीय.. पक्षाने थेट 'अलर्ट मोड'वर येत सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय...राहुल गांधी 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये 10 दिवसीय विशेष निवासी प्रशिक्षणाचं आयोजन काँग्रेसनं केलयं... त्यामुळे जेन झींना सोबत घेऊन राहुल गांधी आता शड्डू ठोकणार असल्याची चर्चा आहे...आणि त्याला कारण ठरलयं...राहुल गांधींच्या उपस्थित होणारं सृजन अभियान... हे अभियान नेमकं काय आहे? आणि राहुल गांधी महाराष्ट्रातील तरुणांशी कसं कनेक्ट होणार आहेत...पाहूयात..

काँग्रेसनं नाशिकमध्ये 10 दिवसाचं सृजन अभियान सृजन अभियानाचं आयोजन केलयं... या अभियानात GEN Zच्या प्रश्नांवर विशेष भर दिला जाणार आहे... देशभरातील तरुणांना पक्षाशी जोडून घेण्यासाठी काँग्रेसनं ही रणनिती आखलीय... विशेष म्हणजे या अभियानासाठी राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. ते GEN-Z सोबत संवाद साधतील..तसचं राहुल गांधी काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार असल्याचीही माहिती आहे...

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने केंद्र सरकारला आधीच हादरवून सोडलयं... पावसाळी अधिवेशनातही विरोधकांच्या आक्रमकतेमुळे सत्ताधाऱ्यांना बॅकफूटवर जावे लागले होते...अशातच राहुल गांधी नाशिकमध्ये दौरा करून GEN-Z शी संवाद साधणार असल्यानं भाजपही सतर्क झालीय. भाजपनं या अभियानावर टीका केलीय.

काँग्रेसने आखलेली ही नवी रणनीती आणि 'जेन झी'ला पक्षाशी जोडून घेण्यासाठी काँग्रेसनं घेतलेला हा पवित्रा येत्या काळात राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकतो.. याआधी 'छात्रो की गुंज' कार्यक्रमातून राहुल गांधींनी देशातील तरुणांना थेट व्यासपीठावर आपल्या समस्या मांडण्याची संधी दिल्यानं तरुणांनी सरकारविरोधातील रोष उघडपणे व्यक्त केलाय.. अशातच नाशिकमधील तरुणाई राहुल गांधींच्या दौऱ्याला आणि संवाद सभेला कसा प्रतिसाद देत हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT