Rahul Gandhi to visit Manipur on June 29 saam tv
देश विदेश

Rahul Gandhi to visit Manipur: राहुल गांधी 29 जून रोजी मणिपूर दौऱ्यावर, इंफाळमधील मदत शिबिरांना देणार भेट

Chandrakant Jagtap

Congress aggressive on Manipur violence: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राज्याच्या दौरा करणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधी २९ आणि ३० जूनला मणिपूरमध्ये विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.

राहुल गांधी मणिपूर दौऱ्यायात इंफाळमधील मदत शिबिरांना भेट देणार आहेत. तसेच सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेणार आहेत. मणिपूरच्या इम्फाळ आणि चुरचंदपूर येथील नागरी समाजाच्या प्रतिनिधींशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत.

ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत आहेत. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी काहीच बोलत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. वेणुगोपाल म्हणाले की, मणिपूर जवळपास दोन महिन्यांपासून जळत आहे. समाजातील संघर्षातून शांततेकडे जाण्यासाठी तोडगा काढण्याची गरज आहे. ही एक मानवी शोकांतिका असून द्वेषाची नव्हे तर प्रेमाची शक्ती बनणे ही आपली जबाबदारी आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोमवारी म्हणाले, संपूर्ण देश मणिपूरवर पंतप्रधान मोदींचे म्हणणे ऐकण्याची वाट पाहत आहे. त्यांनी आधी मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवावे. तसेच मणिपूरमधील सर्व पक्षांशी चर्चा करून सामायिक राजकीय तोडगा काढावा असे आवाहनही खरगे यांनी केंद्र सरकारला केले.

मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले की, अशी बातमी आहे की, अखेर गृहमंत्री (अमित शाह) यांनी पंतप्रधान मोदींशी मणिपूरवर चर्चा केली आहे. गेल्या ५५ ​​दिवसांपासून मोदींनी मणिपूरवर एक शब्दही बोलला नाही. मोदीजींना मणिपूरबद्दल खरच काही वाटत असेल तर सर्वप्रथम तुमच्या मुख्यमंत्र्याला हटवा. अतिरेकी संघटना आणि समाजकंटकांकडून शस्त्रे जप्त करा. सर्व पक्षांशी चर्चा सुरू करा आणि एक समान राजकीय मार्ग काढा. (Marathi Tajya Batmya)

मणिपूर कधीपासून जळत आहे?

ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूरने (ATSUM) 3 मे रोजी 'आदिवासी एकता मार्च' काढला. ही रॅली चर्चंदपूरच्या तोरबांग परिसरात काढण्यात आली. या रॅलीदरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसक हाणामारी झाली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. (Latest Political News)

याच दिवशी हिंसाचार भडकला आणि संध्याकाळपर्यंत परिस्थिती इतकी बिघडली की राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली. नंतर तेथे लष्कर आणि निमलष्करी दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या. मेच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT