Rahul Gandhi Take Mock Interview Deccan Herald
देश विदेश

Rahul Gandhi: राहुल गांधींचे फटकारे ! पत्रकार, खासदारांसमोर मोदी आणि अदानींची घेतली मुलाखत, Watch Video

Rahul Gandhi Take Mock Interview: लोकसभेच्या विरोधीपक्षनेते राहुल गांधींनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्या संबंधावर टीका केलीय. राहुल गांधी यांनी एक्सवर या मुलाखतीचा फोटो पोस्ट केलाय.

Bharat Jadhav

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांची मुलाखत घेतलीय. ही मुलाखत त्यांनी संसदेच्या परिसरात घेतली. विशेष म्हणजे यावेळी पत्रकार आणि काही खासदार देखील होती. पण ही मुलखात मॉक होती. राहुल गांधी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्री संबंधावरून नेहमीच टीका करतात.

आजही राहुल गांधी मॉक मुलाखत घेत पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधींनी या मुलाखतीचा फोटो आणि व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलाय. त्याला ही दीर्घकाळपासून चालू असलेलं नातं असं कॅप्शन दिलंय. दोन विरोधी पक्षातील खासदारांनी मास्क परिधान करून राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या खासदाराने उद्योगपती गौतम अदानी याचा मास्क परिधान केला होता.

यावेळी राहुल गांधींनी दोघांना काही प्रश्न केली. राहुल गांधींना दोघांना त्यांच्या मैत्रीवरून प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना मास्क परिधान केलेले खासदार म्हणाले, आम्ही सर्व कामे एकत्र करतो. अनेक वर्षांपासून आमची मैत्री आहे. संसदेचे कामकाज का ठप्प झाले असा प्रश्न राहुल गांधींनी त्या खासदारांना केला. त्याला उत्तर देताना मुखवटा घातलेले खासदार म्हणाले, "आज अमित शहा गायब आहेत. अमित भाई आज सभागृहात आले नाहीत.

अदानींचा मुखवटा घातलेल्या खासदाराने पीएम मोदीचा मुखवटा घातलेल्या आपल्या सहकाऱ्याकडे बोट दाखवत " म्हणाले, मी जे काही बोलतो ते हे करतात".

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही सभागृहांतील कामकाजात वारंवार व्यत्यय आलाय. सरकारने अमेरिकेतील अदानी यांच्यावर लाचखोरीच्या आरोपांवर चर्चा करावी यासाठी विरोधकांनी केंद्र सरकारवर दबाव आणलाय. विरोधी पक्षांतील नेत्यांनी लोकसभेत पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर राहुल गांधींनी हा मॉक मुलाखतीचा स्टंट करत पंतप्रधान मोदींवर टीका केली.

दरम्यान यावेळी तृणमूल काँग्रेस पक्ष (टीएमसी) आणि समाजवादी पक्षाचे खासदार उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी-एसपी) खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनाला उपस्थित नव्हत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT